संपूर्ण भारतीय समाज इतर समाजांचा आदर करतो
डॉ. इकराम काटेवाला यांचे प्रतिपादन
अहिल्यानगर- सोडेचौदशे वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज बांधव एकत्र नांदत आहे , तरी अनोळखीपणा आहे. अज्ञान हे त्याचे एकमेव कारण आहे. सण उत्सव हे शक्तीप्रदर्शन बनले आहे. या सण उत्सवांचे महत्व व इतिहास आपल्याला सांगावा लागेल. संपूर्ण भारतीय समाज इतर समाजाचा आदर करतो, असे प्रतिदापन डॉ. इकराम काटेवाला यांनी केले.
जमाअत-ए-इस्लामी हिन्दच्या वतीने रमजान ईदनिमित्त कासिमखानी मशिदीत शनिवारी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकमेकांविषयी आदर, स्नेहभाव, बंधुभाव, धार्मिक व सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमावेळी विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.
यावेळी अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड, ललित गुदेंचा,पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार बंडू पवार, गणेश देलमाडे, विठ्ठल शिंदे, दीपक कांबळे, मुरली तांबडे, भाऊ काळोखे, रामदास बेंद्रे, सूर्यकांत वरकड, सुभाष शिंदे,, सुनील चोभे, प्रशांत गवळी,बबलू शेख, समिर मन्यार, दौलत झावरे, रोहित वाळके, आदी उपस्थित होते.
डॉ. इकराम काटेवाले म्हणाले, आपण सणामागचा उद्देश विसरलो, हा उद्देश सांगायला हवा. राष्ट्राचा इतिहास व संकल्पना इतरांपर्यंत पोहोचायला पाहिजे. रोजे, उपवास हे आत्मक्लेशासाठी नसतात, त्यात सूट दिलेली असते. उपवास हे सुधारणा करण्यासाठी तसेच स्वत:वर नियंत्रण व संयम ठेवण्यासाठी असतात. देशात शांतता व बंधूभाव वाढवण्याची गरज आहे. धार्मिक रचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी मशिदीची माहिती व विविध प्रश्नांची उत्तरे मुस्ताक शेख यांनी दिली. प्रास्ताविक मोबिन खान यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार मुस्ताक पठाण यांनी केले. यावेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
stay connected