तीन वर्षाच्या रियांशचा रामनवमी निमित्त उत्सवात उत्स्फूर्त सहभाग
------------------------------------
--------------------------------------
आष्टी ( प्रतिनिधी )
रामनवमी हा धार्मिक सण नुकताच उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.आष्टी येथे केवळ तीन वर्षाच्या चि.रियांश राकेश बोडखे याने हुबेहूब रामाचा वेश परिधान करून रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधले!
६ एप्रिल रोजी आज रविवारी श्रीरामनवमी हा धार्मिक उत्सव अत्यंत उत्साही स्वरूपामध्ये सर्वत्र साजरा करण्यात आला.आष्टी येथील विविध भागांमध्ये रामकथा,धर्म परंपरा संदर्भात विविध कथा मालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आष्टी येथीलच बीड- नगर राज्य रस्त्याच्या बाजूला पंचायत समिती समोर असलेल्या " संवाद " निवासस्थानी चि.रियांश राकेश बोडखे या तीन वर्ष वयाच्या चिमुकल्याने श्रीरामांच्या हुबेहूब वेश परिधान करून छायाचित्रकारांना बेधडक शाहि थाटात पोज दिली.ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी समावेतच तरुण-तरुणी आणि विशेषतः अत्यंत छोट्या बालकलावंत आणि चिमुकल्यांनी श्रीरामनवमी या धार्मिक सण उत्सवात हिरीरीने सहभागी होत आनंद घेतला.
या बालकलावंतांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन कौतुक केले.दरम्यान,या अध्यात्मिक उत्सवात बालगोपाळांबरोबर चि.रियांस ने घेतलेला उत्स्फूर्त सहभाग कुटुंबीयांसह सर्वांनाच अल्लादायक वाटला.अशा भावना चि. रियांशचे आजोबा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी व्यक्त केली.
-------------------
stay connected