राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सोहेल शेख याने द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्द खालापूरी येथे सत्कार संपन्न

 *राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सोहेल शेख याने द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्द खालापूरी येथे सत्कार संपन्न*



*कुस्ती क्षेत्रात खालापूरी गाव अग्रगन्य अनेक पैलवान ह्या गावाने दिले- डॉ जितीन वंजारे*

बीड प्रतिनिधी:- खालापूरी हे गाव पैलवानाच गाव म्हणून ओळखलं जाते ह्या गावात अनेक पैलवान झाले आहेत आणि अजून घडतात. अनेक पैलवान कसरत करून सरकारी सेवेत पोलीस किंवा फौजी म्हणून रुजू झाले आहेत. गावामध्ये अनेक वस्ताद होऊन गेले आणि आता आहेतही त्यामध्ये कल्याण घोलप,दिगंबर गवळी,कैलास उगले,बाबासाहेब नाना डोके,इसाक भाई शेख,राजेंद्र परजने, सुहास खत्री,अशी अनेक वस्ताद आणि त्याने शेकडो पैलवान घडवली.त्यामध्ये लाल मातीतील तालीम तयार करून सपाट्या जोर अन बैठका काढून त्यांना योग्य मार्गदर्शन करून अनेक मल्ल या वस्तादानी घडवले. मी ही दिगंबर गवळी यांच्या तालमीत खेळलो पण शिक्षणा मुळे कुस्तीचा नाद सोडून दिला असे डॉ जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले.

         खालापूरी गावाची आज पैलवान,पोलिस अन फौजीच गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. खालापुरी येथील सध्या टॉप टेन मध्ये सोहेल शेख, अमर गवळी, सोहम परजने, रवींद्र परजने अशी पैलवान आहेत जी चांगली खेळत आहेत. यांच्यात राज्यस्थरीय स्पर्धेत खालापूरी गावातून 1994 साली इसाक शेख या पैवानाने वस्ताद बाबासाहेब डोके यांच्या मार्गदर्शनाने फ्री स्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तालुका, जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय सर्वच ठिकाणी जिंकून इतिहास घडवला होता. नंतर इसाक भाई यांचा मुलगा सोहेल शेख यानेही राज्यस्थरीय कुस्ती जिंकली थायलंड येथे नॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आणि आताही त्याने राज्यस्थरिय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला आहे. त्याच प्रमाणे वस्ताद दिगंबर गवळी यांचे पुत्र अमर गवळी याने विद्युत विभागातर्फे जिल्हा स्तरीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जिंकली गोल्ड मेडल जिंकून खालापूरी च्या कुस्ती स्पर्धेत आपलं नाव नोदवलं त्याच प्रमाणे छोटा सोहम यानेही जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली. अश्या पद्धतीने गावात कुस्ती क्षेत्रात अनेक मातब्बर पैलवानांनी ज्ञात अज्ञात स्पर्धा जिंकल्या आहेत.काल परवा शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय बेल्ट रेसलिंग स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सोहेल शेख या पैलवाणा चा गावात मंदिरासमोर वाजत गाजत आणून मोठा सत्कार केला. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.ग्रामस्थकडून आयोजित या नागरी सत्कार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा गोरगरीब जनतेचे कैवारी डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर, सरपंच गणेश घोलप,माजी सरपंच किरणदादा परजने, उपसरपंच माऊली परजने,कृष्णा परजने,फौजी राजू मुंढे,पमु परजने,प्रल्हाद परजने,गणेश जाधव,बप्पा परजने,सचिन परजने,उद्धव नाना काळे, लोंढे मामा, वस्ताद इसाक भाई शेख,हरी डोके, पोलीस पाटील विष्णू वंजारे,लोंढे, गवळी, जाधव, वंजारे, परजने, काळे इत्यादी उपस्थित होते.सर्वांनी मिळून सोहेल शेख याचा सत्कार केला आणि त्याला पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.