दलितांवर होणार्या अन्याय अत्याचार विरोधात युवा भिमसैनिकांचा जन आक्रोश मोर्चा
आष्टी प्रतिनिधी - बुद्धगया येथील बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे व बौद्ध युवक विकास बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तसेच धनु रणसिंग यांना देखील न्याय मिळावा या मागणीसाठी आज शुक्रवार दि ०४ एप्रिल रोजी युवा भिमसैनिकांच्या जन आक्रोश मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला..या भव्यदिव्य मोर्चात मोठ्या संख्येने भिमसैनिक व महीलाही सहभागी होत्या.
बुद्धगया येथील महाबुद्धविहार हे फक्त बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी राज्यातच नाही तर देशभर आंदोलने सुरू आहेत.
अनेक वर्षाची ही मागणी असून आता या मागणीने उद्रेक स्वरुप निर्माण केले आहे.अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी लक्ष घालुन मागणी लावून धरली आहे. आष्टी तालुक्यातील समस्त युवा भीमसैनिकांच्या वतीने देखील या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
तसेच काही दिवसांपूर्वी विकास बनसोडे यांची देखील जातीय द्वेषातुन हत्या झाली असून त्या हत्येतील आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी देखील आज शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालय आष्टी असे मोर्चाचे आयोजन केले होते.आष्टी तालुक्यातील समस्त आंबेडकरी प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी राहून या मोर्चाचे साक्षीदार झाले. या मोर्चाचे आयोजन संदिप जाधव, कुणाल निकाळजे, दिपक गरुड,सुभाष निकाळजे, अविनाश निकाळजे, सुनिल निकाळजे,नितिन निकाळजे, सुहास पगारे,दिपक वाल्हेकर, अतुल शिंदे, राहुल जाधव,अशोक वाघमारे , आकाश निकाळजे, निखील शिंदे,संतोष कदम,मयूर शिंदे,मुकेश सावंत, विनोद घाटविसावे,अनिल साळवे,महालिंग निकाळजे,विकास बनसोडे यांचे कुटुंबातील सदस्य व महीला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सर्व मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
stay connected