धामणगावच्या सुमित चौधरीचे बँकिंग परीक्षेत दुहेरी यश
कडा ( प्रतिनिधी ) आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील सुमित श्रीकांत चौधरी यांनी बँकेच्या दोन परीक्षांमध्ये यश मिळवले. विशेष म्हणजे दोन्ही परीक्षांचा निकाल एकाच दिवशी जाहीर झाल्याने चौधरी कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
श्रीकांत आणि ललिता चौधरी या शेतकरी कुटुंबातील सुमित हा धाकटा मुलगा . सुमित चौधरी याचे प्राथमिक शिक्षण धामणगाव येथेच झाल्यावर त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयातून घेतले. त्यानंतर संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रोडक्शन इंजिनिअरिंगचे पूर्ण केले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असले तरी त्याचे मन मात्र स्पर्धा परीक्षाकडे ओढा घेत होते. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करण्यावर सुमितने भर दिला . मात्र कोविड काळात या परीक्षेतील लांबलेला काळ , अभ्यासक्रमातील बदल या गोष्टी लक्षात घेऊन सुमितने बँकिंग परीक्षाकडे देखील लक्ष केंद्रित केले. स्वयंअध्ययन करत आवश्यकता भासेल तिथे युट्युबची मदत घेत त्यांनी या परीक्षेचा अभ्यास केला. बँक ऑफ बडोदा मध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी ( प्रोबेशनरी ऑफिसर ) म्हणून तर पंजाब नॅशनल बँकेत लिपिक ( क्लर्क ) म्हणून त्याची निवड झाली . दोन्ही परीक्षेचा निकाल एकाच दिवशी जाहीर झाला . सुमित याच्या दुहेरी यशाने त्याच्या कुटुंबीयांबरोबर धामणगावकर देखील आनंदित झाले.
stay connected