आष्टीत आज डॉ.संजय कळमकर यांचे व्याख्यान आणि महावीर रत्न पुरस्कार प्रदान सोहळा
.............................................
आष्टी प्रतिनिधी
भगवान महावीर स्वामी जयंती निमित्त आष्टी, जि.बीड येथे सकल जैन समाज,आष्टी आयोजित प्रख्यात साहित्यिक,महाराष्ट्रातील खळखळून हसवणारा वक्ता,डॉ.संजय कळमकर यांचे दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी रात्री आठ वाजता आष्टी येथे आनंदऋषी महाराज चौक, कापड बाजार येथे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात भगवान महावीर रत्न पुरस्कार डॉ.मधुकरराव हंबर्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे.भगवान महावीर स्वामी जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानांचे आयोजन करण्याची ही अनेक वर्षाची परंपरा असून,महाराष्ट्रातील अनेक थोर व्याख्यात्यांनी आजवर हजेरी लावली आहे.जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा,असे आष्टी सकल जैन समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
stay connected