शेतकऱ्याच्या मुलाची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात निवड

 शेतकऱ्याच्या मुलाची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यदलात निवड 




आष्टी ( प्रतिनिधी)देवळाली येथील दिनेश भाऊसाहेब देशमाने या शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द व अथक परिश्रमाच्या जोरावर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती होण्याची किमया साधली आहे दिनेश याचे पहिली ते चौथी शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व पाचवी ते दहावी सरस्वती विद्यालय देवळाली येथे झाले अकरावी बारावी पर्यंत शिक्षण संत तुकाराम महाविद्यालय आल्हणवाडी येथे व उच्च शिक्षणासाठी कडा येथील अमोलक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर त्याने ईट येथील भगतसिंग अकॅडमी प्रवेश घेतला तीन महिन्यापूर्वी दिनेशने अहिल्यानगर येथे शारीरिक चाचणी दिली होती त्यात तो उत्तीर्ण झाला व त्याची निवड भारतीय सैन्य दलात अग्निवीर मध्ये झाली 

पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात निवड होणे ही एक मोठी उपलब्धी आहे जी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते 

दिनेशची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल देवळाली ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.