* *जितो अहिल्यानगर द्वारा आयोजित, श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा येथे विश्व नवकार महामंत्र जाप कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन.*
जगामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी भारतासह १०८ देशांमध्ये दिनांक ९ एप्रिल २०२५ वार बुधवार रोजी विश्व नवकार महामंत्र जाप दिवस साजरा केला जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थिती नोंदवणार आहेत.
मानवाच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन मानवाचा सर्वांगीण विकास व्हावा, माणसाला आरोग्य व संपदा प्राप्त व्हावी, यासाठी हा विश्व नवकार महामंत्र जाप आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या कडा या गावामध्ये जीतो , श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ व जैन श्रावक संघ कडा यांच्या वतीने श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या मैदानावर सामूहिक विश्व नवकार महामंत्र जाप या कार्यक्रमाचे दिनांक ९ एप्रिल २०२५ बुधवार रोजी सकाळी ठीक ७:०० ते ९:०० या वेळेत परमपूज्य श्री. पुष्पचुलाजी म.सा. व परमपूज्य श्री. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. जगामध्ये शांतता निर्माण होऊन संपूर्ण जगाचा विकास घडून यावा, याच उद्देशाने हा विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यासाठी, संपूर्ण आष्टी तालुक्यातील बहुसंख्य लोकांनी एकत्र यावे व विश्व नवकार महामंत्राचा जाप करावा, असे आवाहन श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व जैन श्रावक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.
विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यासाठी आष्टी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील जैन व अजैन शिक्षक विद्यार्थी बांधव तसेच समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
संस्थेच्या शतकपूर्ती निमित्त विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन करण्यात आले आहे .
stay connected