बाबा वेंगांची भीतीदायक भविष्यवाणी Baba vanga
वेंगांनी भविष्यवाणी केली होती की, मानवाने विकसित केलेलं एक अत्यंत प्रगत तंत्रज्ञान भविष्यात सर्व कामं सुलभ करेल, पण हाच शोध नंतर मानवतेसाठी सर्वात मोठं संकट ठरेल. त्या काळात AI चा उल्लेख नसला तरी हे भाकीत आजच्या AI च्या युगाशी थेट जुळतं.
सायबर क्राइमचं वाढतं प्रमाण, हॅकिंग, गोपनीय माहितीची चोरी, आणि AI द्वारे चुकीची माहिती पसरवणं यामुळे जगभरात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. बाबा वेंगांचं हे भाकीत एखाद्या इशाऱ्यासारखं वाटू लागलं आहे.
जगप्रसिद्ध अंध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांच्या थरकाप उडवणाऱ्या भाकितांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक आश्चर्यजनक गोष्टींची भविष्यवाणी केली होती — हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, अमेरिकेवरचा हल्ला हे त्यातील काही उल्लेखनीय घटनांचे अंदाज होते, जे प्रत्यक्षात घडल्याचं अनेक समर्थक मानतात.
आता बाबा वेंगांचं 2025 वर्षासाठीचं एक नवं भाकीत समोर आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी महायुद्ध, महाभूकंप, आणि रोगराईसह एक अजून गंभीर संकटाची शक्यता वर्तवली आहे आणि ते संकट आहे सायबर क्राइम आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता).
आणखी चिंतेची गोष्ट म्हणजे त्यांनी 2025 मध्येच जगाच्या अंताची सुरुवात होईल असंही भाकीत केलं होतं. त्यामुळे सायबर क्राइमच्या वाढत्या धोक्यामुळे आर्थिक व्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षेच्या यंत्रणा, आणि वैयक्तिक गोपनीयता यांच्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा अनेक तज्ज्ञही देत आहेत.
बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसच्या भविष्यवाण्या लोकांमध्ये नेहमीच कुतुहूल निर्माण करतात. त्यांचे असंख्य घाबरणारे दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे अख्खं जग हादरून गेलंय. आता अजून एक अशीच मोठी आणि घाबरवणारी भविष्यवाणी समोर आली आहे. जपानचे प्रसिद्ध कलाकार आणि भविष्यवेत्ता रयो तत्सुकी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. रयो तत्सुकी यांना जपानचे बाबा वेंगा संबोधले जाते. रयो यांच्या मते जुलै 2025मध्ये जगात विनाशकारी आपत्ती येणआर आहे. ही आपत्ती आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक असणार आहे. विशेष म्हणजे रयो यांच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता केलेली भविष्यवाणी कुणीही सहज घेताना दिसत नाहीये. सर्वांनीच त्यांची भविष्यवाणी गंभीरपणे घेतली आहे.
stay connected