प्रविण खोलंबे.यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 प्रविण खोलंबे.यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 



_________________________

कला,साहित्य, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.असं कार्य कृतीशील बहुआयामी व्यक्तीमत्व प्रविण खोलंबे.यांना राष्ट्र सेवा परिषद पुणे संस्थेच्या वतीने"आदर्श शिक्षक" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पुणे जिल्ह्यातील सैनिकी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेले प्रविण खोलंबे.हे मराठी विषयाचे अध्यापक असून, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम घेत असतात. विविध विषयांचे वाचन करुन विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवत आहेत. चांगल्या संस्कारांमधुन चांगला माणूस घडू शकतो.त्यांच्या ह्या विचाराने विद्यार्थी नेहमी प्रेरित झालेले दिसून येतात..त्यासाठी ते नेहमी मुलांना स्वतःच्या कृतीच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत.श्रमदान,स्वच्छता, वृक्षारोपण सुंदर माझी शाळा, ज्ञानज्योत, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,गायन स्पर्धा ,शिवचरित्र व भारतीय संविधान वाचन स्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम घेत असून.मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत असतात.कलाकृतीत्मक शिक्षण देत असतात.सृजनशील नागरिक निर्माण व्हावा.यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्याचप्रमाणे त्याचं मराठी साहित्यात उल्लेखनीय योगदान आहे.त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे.नाशिक आकाशवाणी केंद्र व जळगाव आकाशवाणी केंद्रांवर त्यांच्या बऱ्याच कवितांचे अभिवाचन झालं आहे. महाराष्ट्रात ६० हून अधिक ठिकाणी ते साहित्य संमेलनमध्ये कविता सादरीकरण केले आहे. लेखक,कवी,निवेदक म्हणून परिचित असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांच्या ह्या साहित्य व सांस्कृतिक योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या शिक्षण सेवेचा गौरव म्हणून,त्यांना राष्ट्र सेवा परिषद,पुणे या संस्थेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा मित्रमंडळ काॅलेजचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर, साहित्यिक साहेबराव पवळे, शिवाजी भापकर,प्रिया खैरेपाटील, राष्ट्र सेवा परिषदेच्या अध्यक्षा तेजस्वी आमले मॅडम,मराठबोली संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर उमरदंड अशा विविध मान्यवरांच्या हस्ते प्रविण खोलंबे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळ काॅलेजचचे प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर, साहेबराव पवळे,शिवाजी भापकर, राष्ट्र सेवा परिषदेच्या अध्यक्षा तेजस्वी आमले मॅडम, उपाध्यक्षा प्रिया खैरेपाटील,मराठबोली संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर उमरदंड अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 

शनिवार दि.५ एप्रिल २०२५ रोजी मराठवाडा मित्रमंडळ काॅलेजचे संत ज्ञानेश्वर सभागृह डेक्कन,पुणे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न ‌झाला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.