मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल एस.एम.देशमुख कडून अभिनंदन

 *मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल एस.एम.देशमुख कडून अभिनंदन*


*- पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन काढु - मुख्यमंत्री* 


*पेन्शन वाढीच्या संदर्भातही लवकरच निर्णय - मुख्यमंत्री* 





मुंबई / प्रतिनिधी 

देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात 2017 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला.. मात्र त्याचे नोटिफिकेशन निघाले नाही.. त्यामुळे कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेला नाही..

आज देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके यांनी  देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी "लवकरच नोटिफिकेशन काढून कायदयाची अंमलबजावणी करण्यात येईल" असे आश्वासन  दिले..

एस.एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेने सतत बारा वर्षे लढा दिल्यानंतर राज्यात 2017 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला होता.. त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि कायदा गॅझेट मध्ये आला.. मात्र त्याचे राज्य सरकारने नोटिफिकेशन न काढल्याने कायदा अंमलात आलेला नाही.. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. ही बाब दीपक कैतके यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली..

पत्रकार पेन्शन वाढीच्या संदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले..

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.