माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारो तरुणांचा भाजपमध्ये प्रवेश
***********************************
नवमतदार,तरुण,कार्यकर्ते,नागरिकांचा सुरेश धस यांच्या विश्वासाहर्तेकडे ओढा
*********************************
***********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदारसंघातील हजारो तरुण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसून येत आहे .माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर व यांनी केलेल्या कामावर तरुणाई फिदा झाली आहे.
तेजवार्ता चा स्पेशल शो - जनतेच्या मनातला आमदार कोण ? नक्की पहा👇📽️
गेल्या 30 वर्षापासून माजी मंत्री सुरेश धस जनसेवेमध्ये अविरत सेवा करत असून त्यामुळेच त्यांना तीन वेळा विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे .कोरोनाचा काळ असो की बिबट्याचा काळ असो किंवा दवाखान्यातील कोणतीही आपत्ती असो या कामांमध्ये धस यांच्याकडे गेलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत आला नाही.प्रत्येकाला मदत करायची आणि जनसेवा करायची हे व्रत सुरेश धस यांनी गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू ठेवले आहे .गेल्या दोन वर्षांपूर्वी आष्टी मतदार संघामध्ये बिबट्याने कहर केला होता .त्यावेळी रात्री अपरात्री ही धस हे नागरिकांच्या मदतीला धावून येत होते तसेच कोरोना काळामध्ये स्वतःचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालूनही त्यांनी हजारो रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले.त्यावेळी विरोधक मात्र घरामध्ये बसले होते हे वास्तव नाकारून चालणार नाही .आता आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून दररोज शेकडो तरुणांचा धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश होत आहे. यामध्ये
आष्टी-पाटोदा-शिरूर का. विधानसभा मतदार संघातील ॲड. बाबासाहेब सोपान लटपटे, बावी, ॲड. गोविंद घुले, ॲड. बाबुराव गर्जे,
आष्टी नगरपंचायत २०२१-२२ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उभे असलेले उमेदवार लक्ष्मण गायकवाड (प्र.क्र. १), माजेद शेख (प्र.क्र. ४), जाकीर आत्तार (प्र.क्र. ८), हौवसराव वाल्हेकर (प्र.क्र. १२), सुनील निकाळजे (प्र.क्र. १३) व अपक्ष उमेदवार काशीगीर शिनगारे, आयाष कुरेशी, सायकड वस्ती येथील बालाजी सायकड मित्र परिवार, पाटोदा येथील तोहसीफ खान (खान साहेब), लोणी सय्यदगीर ग्रा.पं. सदस्य अक्षय सावरे,
आष्टी-पाटोदा-शिरूर का. विधानसभा मतदार संघातील चिंचाळा येथील अशोक आप्पा पोकळे तसेच पाचंग्री येथील मा. सरपंच संतोष कोल्हे, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र मुंढे,पै. बाजीराव मुंढे, अक्षय गिरी, शाम मुंढे, प्रदीप मुंढे, केशव कोटूळे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक पोपळे, कुमार पोपळे, बब्रूवान वायकर, केळसांगवी येथील माजी सरपंच महादेव पडोळे,देवी निमगाव माजी उपसरपंच दत्तू पवणे,ग्रा.प.सदस्य भाऊ काचुळे,वाकीचे संदीप पाटील, मराठवाडी,हारेवाडी, पिंपळगाव घाट, किन्ही, केरुळ, खुंटेफळ, लोणी गटातील तसेच दादेगाव,कोल्हेवाडी यासह परिसरातील नागरिक व शेकडो तरुण व किन्ही व वेताळवाडी येथील ५० ते ६० युवक,आष्टी येथील नगरसेवक महादेव शिखरे यांनी कार्यकर्त्यांसह तसेच लिंबोडी व चोभानिमगाव या गावांतील कार्यकर्ते,आष्टी, चोभा, निमगाव, पारोडी, बीडसांगवी, गणगेवाडी, वाडेगव्हाण, सांगवीआष्टी, पिंपळा येथील तरुण कार्यकर्ते,फुलेनगर आष्टी, कोहिनी, चोभानिमगाव,हातोळण या गावांतील अनेक तरुण,लोणी सय्यदमीर येथील ग्रामपंचायत सदस्य जुबेर अजीज शेख यांनी ४० समर्थक, आष्टी देवळाली येथील सागर तळेकर,माऊली नगारे , पांडुरंग शेकडे,हर्षद तांदळे,सोमा तांदळे,हरी आमले,जावेब सय्यद,कल्याण तांदळे,कडा येथील सौ. लताबाई किसन शिरोळे यांच्यासह इतर महिला,मानूर बडेवाडी येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष आदिनाथ आबा नागरगोजे, प्रकाश नागरगोजे, उद्धव नागरगोजे, उत्तमनगर दहीवंडी ग्रामपंचायत सदस्य दत्ता तिळकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल तिळकर, अरुण कुसळकर, कैलास गुंजाळ, मनोज शेलार, अनिल शेलार, रमेश मुंजाळ, सचिन गुंजाळ आदी कार्यकर्ते, शिरूर कासार येथील ज्येष्ठ नेते संतोष भांडेकर, युवा नेते दिनेश दादा गाडेकर व युवा नेते सागर भांडेकर, पाटोदा येथील युवा कार्यकर्ते तौफिक खान आणि शेकडो इत्यादी मतदारसंघातील विशेषतः नवं मतदार झालेल्या तरुणांनी पसंती देत प्रवेश केला.सर्वांचे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने स्वतः मनःपूर्वक स्वागत 231 आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना शिंदे गट रिपाई आठवले गट व त्याचे अधिकृत उमेदवार धस सुरेश रामचंद्र यांनी केले.
stay connected