मार्केट कमिटीच्या माजी उपसभापतीसह, माजी सरपंच-उपसरपंचाचा कार्यकर्त्यांसह
धोंडे गटात प्रवेश
आष्टी प्रतिनिधि
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जनार्धन भवर यांच्यासह माजी सरपंच आणि माजी उपसरपंचासह लोणी पिंपळा परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला.
कोण आहे जनतेच्या मनातील आमदार ? नक्की पहा👇📽️
याबाबत अधिक माहिती अशी की, जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे, तसतसं अपक्ष उमेदवार माजी आ. भीमराव धोंडे यांचे पारडे जड होत चालले आहे. पर्यायाने शिट्टीचा आवाज मतदार संघात वाढत चालला आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कार्यकर्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जनार्दन भवर, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजयकुमार नामदेव भवर तसेच त्यांचे समर्थक आणि माजी सरपंच इसाक तांबोळी, माजी उपसरपंच सुभाष भवर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यासह अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला, याप्रसंगी माजी सभापती साहेबराव म्हस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यामुळे धोंडे गटात शिट्टीचा आवाज जोरदार वाढला आहे. सर्व प्रवेशित कार्यकर्त्यांचा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लोणीचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सागर भवर त्याचप्रमाणे खरडगव्हाण येथील रणजीत वाडेकर, अक्षय काळोखे, संदीप कारंडे, लालू शेख यांनीही धोंडे गटात प्रवेश केला. लोणी पिंपळा येथील मतदारांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शिट्टी या चिन्हांला मतदान करण्याचे आवाहन केले
stay connected