लोणी येथे जेसीबी मधून पुष्पवृष्टीने माजी आ. भीमराव धोंडे यांचे स्वागत,

 लोणी येथे जेसीबी मधून पुष्पवृष्टीने माजी आ.  भीमराव धोंडे यांचे स्वागत,

 



मतदारसंघात दगाफटक्याचे राजकारण - साहेबराव म्हस्के 


 आष्टी प्रतिनिधी 


 गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघात दगाफटक्याचे राजकारण चालू आहे अशा व्यक्तिंना मतदारांनी सत्तेपासुन दुर ठेवावे, जनतेच्या आग्रहास्तव मा. आ. भीमराव धोंडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. भीमराव धोंडे यांनी कधी भांडणे लावली नाहीत. मतदारसंघाच्या विकासाबरोबर शांतता राखण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी प्रयत्न केले.  त्यामुळे त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी लोणी सय्यदमीर येथे केले.

 माजी आमदार भीमराव धोंडे यांचे लोणी येथे जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत तोफा वाजवत  जोरदार स्वागत करण्यात आले. पिंपळा येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार भीमराव धोंडे गटात प्रवेश केला.

   याप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती साहेबराव म्हस्के, लक्ष्मण कराळे, सरपंच सावता ससाणे, हरिभाऊ जंजिरे, ॲड रत्नदिप निकाळजे, उपसरपंच चांगदेव एकशिंगे, थोरात सर व इतर उपस्थित होते.

     माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, निवडणुकीत यश अपयश येत असते, लढतो तो पैलवान असतो. मी कधी गुत्तेदारी केली नाही तसेच मी कधी कोणत्या कामात कमिशन घेतले नाही.  गोरगरिब शेतकऱ्यांसाठी दिल्लीला पायी मोर्चा काढला होता त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या, सर्वसामान्य लोकांसाठी काम करीत आहे. यापुर्वी  बीड, मुंबई, दिल्ली असे अनेक मोर्चे काढले. लोणी सय्यदमीर हे मोठे गाव आहे येथे विविध प्रकारचे शिक्षणाची सोय करण्यात येईल. 

     पुढे बोलताना माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की, मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून दगाफटक्याचे राजकारण सुरू आहे‌ गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दगाफटका झाला आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष म्हणून  निवडणूक लढवत आहेत. भीमराव धोंडे यांनी कधीही भांडणे लावली नाहीत. 2014 मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावले आहेत. मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. काही लोक राजकारणात दगाफटका का करीत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी वर्ग भाजपावर नाराज आहे. दुधाचे भाव कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात भावना व्यक्त होत आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडून कोणावरही  अन्याय होणार नाही तसेच कोणालाही त्रास होणार नाही. अपक्ष असले तरी मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होणार आहेत. ॲड. रत्नदिप निकाळजे यांनी सांगितले की, विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांना विजयी करावे.

विजयकुमार भवर यांनी सांगितले की,

आमच्या बाबतीत अनेक वेळा दडपशाही झाली. तुम्ही आम्हांला फक्त पाठबळ द्या  पिंपळ्यातून मताधिक्य देऊ. उपसरपंच चांगदेव एकशिंगे यांनी सांगितले की, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या पाठीमागे उभे रहावे. शिट्टी ला मतदान करावे.  याप्रसंगी अशोकराव सावरे, सरपंच सावता ससाणे, संजय धायगुडे, युवराज खटके,थोरात सर व इतरांची भाषणे झाली. माजी उपसभापती जनार्दन भवर,राम शिंदे, रामेश्वर वाळके, , चेअरमन बाळासाहेब भवर, पांडुरंग गावडे, चंद्रशेखर साके, दादासाहेब विधाते, , संजय धायगुडे, गणेश पोकळे, पांडूळे पाटील, बाळासाहेब बेल्हेकर, दादासाहेब सांगळे, उपसरपंच राम देवकर, छबुराव देवकर, युवराज कटके,  माजी सरपंच राजु गावडे, दादासाहेब सांगळे, विजयकुमार भवर,सुभाष भवर, नवनाथ रक्टाटे, माजी सरपंच इशाक तांबोळी, संतोष वाळके,दत्ता विधाते यांच्यासह लोणी पिंपळा परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.