तरूणांचे प्रश्न घेऊन निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय ठरतोय महत्त्वाचा : महेबुब शेखची क्रेझ वाढली
:- आष्टी मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन आष्टीच्या तीन मातब्बर व प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात शरद पवार यांनी नवख्या व निष्ठावंत कार्यकर्ते महेबुब शेख यांना उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आष्टी येथे संपन्न झालेल्या खा शरद पवारांच्या सभेतील महेबुब शेख यांचं भाषण मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे महेबुब शेख नवख्या उमेदवार नसुन खमक्या उमेदवार शरद पवारांनी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे एक अभ्यासू व वैचारिक व सामाजिक क्षेत्रातील चेहरा म्हणजे महेबुब शेख यांनी संपुर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. तसेच शरदचंद्रजी पवार साहेबांनी आष्टी मतदारसंघातील जुन्या नव्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोट बांधली. महेबुब शेख यांच्या पाठिमागे वज्रमुठ तयार केली असून त्यामध्ये मोठी भर म्हणून माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत तसेच सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनीही पक्षात प्रवेश केल्याने महेबुब शेख यांना मोठा लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच मागील आमदारांनी आष्टी मतदारसंघातील तरूणांचे जिवनमान उंचावण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना न केल्याने हाच प्रमुख धागा पकडून महेबुब शेख यांनी मतदारसंघातील तीनही तालुक्यात एमआयडीसी व मतदारसंघात एक साखर कारखाना पाच वर्षात सुरू करून दाखवेल असा विश्वास मतदारसंघात मतदारांना देत आहेत.
सर्वसामान्य मतदारातुन महेबुब शेख यांचे निवडणुकीतील संकल्प मान्य असल्याने सध्या संवाद दौऱ्या निमित्त गावात आल्याने नागरिकातुन महेबुब शेख यांचे जोरदार स्वागत होत आहे. अनेक गावात तर महेबुब शेख यांना डोक्यावर सुध्दा घेण्यात येत असल्याने येत्या २० तारखेला महेबुब शेख यांना आष्टी मतदारसंघातुन विधानसभेत पाठविणार असल्याचे मतदार मत व्यक्त करत आहेत.
खा शरद पवार हे एक सर्व जाती धर्माचे एक आश्वासित चेहरा आहेत राजकिय जिवनात अनेक राजकीय स्थित्यंतर पाहीले आहेत. अनेक नेत्यांचे राजकीय करियर घडविले आहे. महेबुब शेख हे शिरूर तालुक्यातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यांना उमेदवारी देऊन एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार निवडला असल्याने व नवा चेहरा म्हणून त्यांच्या उमेदवारीला पसंती मिळत असल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे .
stay connected