आ.बाळासाहेब आजबे यांनी जाहीरनाम्यात शेती,पाणी,वीज,रोजगार व रस्ते विकासाला दिले प्राधान्य
आष्टी प्रतिनिधी
आष्टी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये त्यांनी शेती पाणी रस्ते रोजगार व वीज या प्रश्नाला प्राधान्य दिले, येणाऱ्या पाच वर्षात या सर्व गोष्टींना प्राधान्य देत मतदार संघ सुजलाम सुफलाम करणार असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत ही निवडणूक विकास कामांच्या जोरावर लढवणार असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांनी बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पत्रकार परिषद घेत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये अद्ययावत आरोग्य सुविधांचा वादा, शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा, दर्जेदार रस्तेआणि पायाभूत सुविधांचा वादा, सर्वांगीण शिक्षणाच्या पायाभरणी वादा, सामाजिक विकासाचा वादा करण्यात आला आहे. तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर मध्ये तालुक्यामध्ये एमआरजीएस अंतर्गत 423 कोटी रुपयांच्या रस्त्यांची विकास काम करण्यात आली आहेत सुरडी आणि शेडाळा येथे आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी आश्रम शाळेसाठी 40 कोटी रुपये मंजूर केले आष्टी मतदारसंघातील महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 15 कोटी रुपये मंजूर करून आणले पाटोदा तालुक्यात नवीन प्रशासकीय इमारत महसूल कर्मचारी निवास आणि दुय्यम निबंधक कार्यालयाचे निर्माण करण्यासाठी 42 कोटी रुपये कामांना मंजुरी शिरूर कासार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी 15 कोटी रुपये तर शिरूर कासार तालुक्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी दहा कोटी रुपयांचे वस्तीग्रहास मान्यता शिरूर तालुक्यात कृषी अधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी सहा कोटी रुपये व शिरूर कासार तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय इमारत आणि भूमी अभिलेख कार्यालय इमारतीसाठी एकूण चार कोटी 76 लक्ष रुपये च्या विकास कामांना मंजुरी आणून हे कामे प्रगतीपथावर नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले , येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाच्या प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेअंतर्गत आष्टी तालुक्याच्या रहिवाशांसाठी कालव्याद्वारे 5.68 टीएमसी पाणी देण्याचा तसेच आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी पिंपळसूटी सांगवी संगमेश्वर सांगवी नागापूर खडकत एक खडक दोन या गावांमध्ये सहा लातूर पॅटर्न चेक डॅम बांधण्यात येणार जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जलपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी शिरूर तालुक्यात सिंदफणा नदीच्या काठावर दोन लातूर पॅटर्न चेक डॅम बांधण्यात येणार आष्टीमध्ये शंभर बेडची क्षमता असलेले हउपजिल्हा रुग्णालय अद्यावत करणार शिरूर कासार पाटोदा तालुक्यात साठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा वादा या ठिकाणी करत असून आष्टी पाटोदा परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी सोयाबीन मका हरबरा इत्यादी पिकांसाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसची सुविधा उभारण्याचा तसेच औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीची स्थापना करण्याचा प्रयत्न करणार असून शिरूर परिसरात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी एक पावर हाऊस सब स्टेशन युनिट उभारण्याचा वादा तर लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये वरून दोन हजार रुपये वाढ कशी करता येईल यासाठी ही सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचा वादा या जाहीरनाम्याद्वारे आमदार बाळासाहेब आजबे यांनी जनतेशी संवाद साधून सांगितले पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की भाजपाचे उमेदवार विकास कामाचे सोडून दुसरेच आरोप त्यांच्या प्रचार दरम्यान करत आहेत माझ्यावर बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत ,आपण गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे आपण आणलेला विकास निधी हा विरोधकांना देखवत नसून त्यांच्यासारखे वक्कल गायब करण्याचे काम आम्ही केले नाही गावागावात वाडी वस्ती तांडा या ठिकाणी विकासकामे केली त्यामुळे मतदार संघातील जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे येणारी निवडणूक ही आपण विकास कामे व जनतेच्या विश्वासावर लढवणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले. यावेळी जेष्ठ नेते दशरथ दादा वनवे नवनाथ ढाकणे सर तालुका अध्यक्ष काकासाहेब शिंदे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लटपटे दीपक दादा घुमरे विश्वास भाऊ नागरगोजे युवराज झुंनजुरे माझी सभापती संतोष गुंड परशुराम मराठे हरिभाऊ दहातोंडे धैर्यशील थोरवे रुपेश बेदरे व्यासपीठावर उपस्थित होते.
stay connected