वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची आज अखेर पदावरून उचलबांगडी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या Election commission दट्टय़ानंतर राज्य सरकारने वादग्रस्त IPS officer आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांची आज अखेर पदावरून उचलबांगडी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. भाजपचा अजेंडा राबवणाऱया रश्मी शुक्ला यांना विधानसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत हटवून निवडणूक आयोगाने महायुतीला धक्का दिला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात पार पाडण्यासाठी रश्मी शुक्ला यांना हटवण्याची जोरदार मागणी महाविकास आघाडीने केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 24 मार्च रोजी यासंदर्भातील पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत आले होते त्या वेळेला रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यांना या पदावरून हटवण्यासाठी काँग्रेसने चार वेळा निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. पण अखेर पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारला रश्मी शुक्ला यांना हटवावे लागले.
stay connected