मतदारसंघातील देव देवतांचे दर्शन व महापुरुषांचे पूजन करत आ.बाळासाहेब आजबेंनी केला प्रचाराचा शुभारंभ

 मतदारसंघातील देव देवतांचे दर्शन व महापुरुषांचे पूजन करत आ.बाळासाहेब आजबेंनी केला प्रचाराचा शुभारंभ












 आष्टी प्रतिनिधी

 आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांनी मंगळवार दिनांक 05 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील देव-देवतांचे दर्शन घेऊन व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून अभिवादन करत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला. 

       आष्टी विधानसभेसाठी दिवसेंदिवस रंगत वाढली असून सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांनी मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी आपला प्रचाराचा शुभारंभ साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केला सकाळी 9 वाजता कडा कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांचे आशीर्वाद घेत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला त्यानंतर कडा येथे महेश मंदिर व मौलाली बाबा दर्गा येथे दर्शन घेतले तर आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर पाटण येथील बिरोबा देवस्थान धनगड पाटण नारळ वाढवून दर्शन घेतले त्यानंतर लाखो  लोकांचे श्रद्धा स्थान असलेले गहिनीनाथ गड येथे गहिनीनाथ व वामन भाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले गहीनाथ गडाचे मठाधिपती ह भ प विठ्ठल महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले कुसळब येथे खंडोबा देवस्थान या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून शुभारंभ केला तर अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी या ठिकाणीही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात अश्वलिंगाचे दर्शनी घेत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला अशा पद्धतीने आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आज दिवसभर मतदारसंघातील देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेत आपल्या प्रचाराचा शुभारंभ साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.