आष्टी मतदारसंघात माजी मंत्री सुरेश धस कामांचा धडाका
आज आष्टी तालुक्यात 24 कोटी 46 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी मतदारसंघात माजी मंत्री सुरेश धस यांनी विविध विकास कामांचा गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोट्यवधी रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा धडाका लावला आहे. आज आष्टी तालुक्यात 24 कोटी 46 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूज माजी मंत्री सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते होणार आहे.
आष्टी तालुक्यात 24 कोटी 46 लक्ष रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. मातकुळी मातकुळी कर्हेवडगाव रस्ता भूमीपूजन 4 कोटी 56 लक्ष,सकाळी 8:45 वा.भातोडी विविध विकासकामांचे भूमीपूजन 3 कोटी 29 लाख सकाळी 9:30 वा.आष्टा (ह.ना.) शिंदे वस्ती रस्ता भूमीपूजन 3 कोटी 83 लाख,सकाळी 10 वा.,आंधळेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 4 कोटी 8 लाख,सकाळी 11 वा.मुर्शदपूर
माऊली मंदिर रस्ता भूमीपूजन 5 कोटी रुपये
पिंपरी रोड भूमीपूजन सिमेंट रस्ता 4 कोटी आदी विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आवाहन भारतीय जनता पार्टी पदाधिकारी यांनी केले आहे.
stay connected