आष्टी वकील संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरु

 आष्टी वकील संघाची निवडणुकीची रणधुमाळी सुरु                                           ---------------------------------------------                                   अध्यक्ष पदासाठी चार, उपाध्यक्ष पदासाठी तीन सचिव पदासाठी चार, कोषाध्यक्ष पदासाठी दोन, व महिला प्रतिनिधी साठी दोन उमेदवारी अर्ज दाखल                               

                        ___________________________

आष्टी प्रतिनिधी :- दर सालाबादा प्रमाणे या वर्षी आष्टी वकील संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे.     विविध पदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 11 आक्टोबर हा होता. अंतिम दिवसापर्यन्त अध्यक्ष पदासाठी ऍड अजय नानासाहेब जेवे, ऍड बाळासाहेब महादेव झांबरे, ऍड संभाजी मोहन दहातोंडे, ऍड नवनाथ सीताराम विधाते असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी ऍड यासिर ताहेर सय्यद, ऍड किशोर कल्याण निकाळजे, ऍड सतीशकुमार गहिनीनाथ गायकवाड असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्याच प्रमाणे सचिव पदासाठी ऍड यासिर ताहेर सय्यद, ऍड किशोर कल्याण निकाळजे, ऍड सतीशकुमार गहिनीनाथ गायकवाड, ऍड नितीन नामदेव बोडखे, असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच कोषाध्यक्ष पदासाठी ऍड संदीप रावसाहेब जगताप, ऍड दिलीप लक्ष्मण दरेकर असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तसेच महिला प्रतिनिधी या जागेसाठी ऍड प्रतीक्षा श्रीमंत डावकर, ऍड अर्चना चंद्रशेखर पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस. झांजे, सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड बाप्पुराव भास्कराव गर्जे यांनी दिली.                            आष्टी वकील संघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पदासाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. आष्टी वकील संघाची निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख 17 आक्टोबर 2024  असून कोण उमेदवार अर्ज माघार घेणार कोण उमेदवार लढणार कि बिनविरोध होणार हा विषय वकील संघात चर्चेचा ठरत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.