धानोरा येथे धनगर बांधवांचे आरक्षण प्रश्नी रस्ता रोको आंदोलन संपन्न

धानोरा येथे धनगर बांधवांचे आरक्षण प्रश्नी रस्ता रोको आंदोलन संपन्न



धनगर जमातीला अनुसूचित जमाती (ST) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने आष्टी तालुक्यातील धानोरा येथे संतोषी माता चौकात सोमवार दि . २३ रोजी सकाळी 11 .30 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले .

Vdo पहा



 धनगर जमात महाराष्ट्रात पिढयानपिढ्या मेंढपाळ आणि पुशपालक म्हणून कार्यरत आहे. १९५६ साली अनुसूचित जमातीच्या (SC/ST) यादी "धनगड" नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या ६८ वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. "धनगड" नावाची जमात अस्तित्वात नतसानाही ही चूक घडली आहे.


महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, "धनगड" जमात अस्तित्वात नाही, मात्र "धनगर" जमात अस्तित्वात आहे. त्यामुळे, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरीता शासनाने त्वरीत शासन निर्णय काढणे आवश्यक आहे.


"धनगड" नावाची जमात १९५६ मध्ये आणि त्याआधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, "धनगर" जमात अस्तित्वात होती आणि आहे. त्यामुळे, "धनगड" च्या जागी "धनगर" जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम ३४२ (१) नुसार आवश्यक आहे.


पंढरपूर आणि लातूर येथे मागील १२ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणकत्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून, महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत.


पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. १२ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, मुख्यमंत्री महोदयांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते.

आत्तापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करुन बऱ्याच वेळा दिशाभुल केली असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना अश्या भावना येऊ लागल्या आहेत, तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा, असे धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घ्यावा अशा विवीध मागण्यांसाठी हा रस्ता रोको धानोरा येथे संपन्न झाला . 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड प्रदिप चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती . तसेच यावेळी रामहरी महारनोर , अशोक ढवण , घोंगडेवाडी चे  सरपंच भाऊसाहेब गावडे ,ॲड प्रदिप चव्हाण , शिवाजी बुरंगुळे , युवराज खटके , संजय पारखे , अमोल खटके , आबा पालवे , राजेश लकडे ' अनिल पालवे , श्रिकांत गोफणे , शिवाजी पालवे , सुखदेव खटके आदी धनगर बांधव मोठया संखेने उपस्थित होते .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.