शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना शासनाने मानधन सुरू करावे, जळगांव व वाकी येथे रथातून तर नांदा येथे बैलगाडीतून मा. आ. भिमराव धोंडे यांची मिरवणूक

 शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना शासनाने मानधन सुरू करावे, जळगांव व वाकी येथे रथातून तर नांदा येथे बैलगाडीतून मा. आ. भिमराव धोंडे यांची मिरवणूक
 




आष्टी ( वार्ताहर):- आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  माजी आ. भीमराव धोंडे यांनी बुधवारी दिनांक १८  सप्टेंबर रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आष्टी तालुक्यातील कडा जि. प. गटात जनसंपर्क दौरा केला. वाकी व जळगांव येथे मा. आ. भिमराव धोंडे यांची रथातून तर नांदा येथे  बैलगाडीतून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी तोफा वाजवून व डीजे  लावुन स्वागत झाले. महाराष्ट्र राज्यातील शेतीनिष्ठ शेतकऱ्यांना शासनाने मानधन सुरू करावे असे  माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कडा गटातील ठिकठिकाणी 

गावभेटी दरम्यान झालेल्या सभेत सांगितले. बुधवार पासुन दुसऱ्या टप्प्यातील गावभेट दौरा सुरू केला. शिराळ, दैठण, पिंपळसुटी,वाकी, वाकी ( सावता नगर), कानडी, फत्तेवडगाव, नांदा, धिर्डी, केळ सांगवी, जळगांव, चोभा निमगाव, खाकाळवाडी, शेरी बुद्रुक, शेरी खुर्द या गावाचा दौरा केला.



       पुढे बोलताना माजी आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की आता बी. एड. डी. एड. शिकुन भरपुर झाले. युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी काम करायचे आहे. आय. टी. आय. सुरू करुन टेक्निकल शिक्षण द्यायचे  आहे. भविष्यात मी नसलो तरी शाळा सुरूच राहुन तेथे मुले शिकतच राहतील. शिक्षणातून सर्वांगिण विकास होतो.  विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. माझ्या काळात जेवढी विकास कामे झाली तेवढे कामे कोणीच केले नाहीत. अनेक गावांत पाझर तलाव केले. शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काम करुन ठेवले, मी आमदार नसताना पाझर तलाव झाले का ? असा त्यांनी उपस्थित केला.

       जेष्ठ नेते  दिलीपराव काळे यांनी सांगितले की,मा. आ. भिमराव धोंडे यांचा स्वभाव शांत, संयमी आणि मनमिळावू आहे.  त्यांनी मतदारसंघात गोरगरिबांसाठी शिक्षणाची गंगा आणली. मतदारांनी चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावेत.

उद्योजक रावसाहेब खिळे यांनी सांगितले की, माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कानडी परिसरातील सर्व रस्त्यांची उत्कृष्ट कामे केली आहेत. तसेच कानडी  गावात शाळा सुरू करुन मुलींच्या शिक्षणाची सोय केली आहे खरोखरच त्यांनी शैक्षणिक विकास केला आहे.  सर्वसामान्य जनतेकरीता  शिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. कडा कारखाना येथे आल्यावर सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर  आकर्षक अशा बग्गीतून  त्यांची मिरवणूक काढण्यात आली. वाकी व सावता नगर येथील चक्रधर स्वामी मंदिर जाऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दर्शन घेतले. जळगांव येथे जगदंबा मातेचे तसेच वेगवेगळ्या गावात ग्रामदेवतांचे दर्शन घेतले. वाकी येथे ग्रा. पं. सदस्य गौतम ससाणे यांच्या हाॅटेल सम्राटचे उद्घाटन त्यांच्या  हस्ते करण्यात आले. नांदा येथे राजाराम औटे यांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. दौऱ्यामध्ये भाजपाचे युवा नेते अजयदादा धोंडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शंकरराव देशमुख, भाजपा  किसान सभेचे तालुकाध्यक्ष बबनराव औटे, दिलिपराव काळे, चेअरमन विठ्ठल लांडगे, बजरंग कर्डीले, तावरे, चेअरमन दादासाहेब हजारे, राजु रासकर, मोहन कर्डिले, आबा बोराडे, भिमराव कर्डीले, कुंडलीक आस्वर,  सुरेश आस्वर, महेश पवळ उपस्थित होते. वेगवेगळ्या ठिकाणी बबनराव औटे,विजय पवार, पंचायत समिती सदस्य संदीप आस्वर, बाळासाहेब वाघुले, सरपंच नानासाहेब औटे,माजी सरपंच बाळासाहेब खिळे, आजिनाथ औटे,माजी सरपंच दत्ता पाटील,अंबादास औटे व इतरांची भाषणे झाली.  ठिकठिकाणी झालेल्या सभेस  आमदार बाळासाहेब आजबे यांचे चिरंजीव  यशभैय्या आजबे,महेश आजबे,माजी जि. प. सदस्य गंगाधर आजबे, माजी जि. प. सदस्य सतिश झगडे, पं. स. सदस्य संदीप आस्वर, सरपंच ज्ञानेश्वर जगताप, राज्यशासन पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी दत्तोबा ढोबळे पाटील, कुसुमाकर कुलकर्णी,हौसराव आजबे, माजी सरपंच केशव आजबे, नानासाहेब पवळ, मोहनराव घुले, उद्योजक रावसाहेब खिळे, सुधीर ढोबळे, मधुकर लांबडे, बाळासाहेब वाघुले, वामनराव करडूळे,मार्केट कमिटीचे संचालक आण्णासाहेब लांबडे, रावसाहेब जाधव, सुर्यभान चव्हाण, सरपंच दादासाहेब जगताप, अशोक लांबडे, अभिजित काळे, सुभाष सकट, नाजिम सय्यद, अशोक सकट,  सिताराम कानडे, सरपंच नानासाहेब ओटे, रावसाहेब गिर्हे, काशिनाथ कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, कैलास यादव, अमोल सरोदे, माजी सरपंच बाळासाहेब खिळे, गौतम ससाणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर गदादे, दळवी महाराज, धोंडीबा धुमाळ, प्रविण कानडे, आकाश पाटील, कामराज कारंजकर, बाबासाहेब ससाणे,दिपकसेठ आस्वर, धनलाल यादव, सरपंच सौ. सपना आस्वर, माऊली आस्वर, सुधीर आस्वर, नाना मोरे पाटील,लक्ष्मण शिंदे , गोरख महाराज काळे, बबन खरपुडे, ग्रा. पं.  सदस्य आदेश निमोनकर, शेख इमामभाई, विष्णू वाळके, किसन कारंजकर, अभिषेक कानडे, जगन्नाथ काळे,  संपत काळे, कैलास गजघाट, मारुती गजघाट, दादा फौजी, दिपक खरपुडे, राजाभाऊ वाघमारे, सुधाकर भालेकर, मयूर आस्वर,गणपतराव करडूळे, दादासाहेब गजघाट, गोपीनाथ कन्हेरकर,अशोक खकाळ,संजय खकाळ, सुभाष ढोबळे पाटील, युवराज शिंदे, डॉ . गांजुरे, साहेबराव शिंदे, सचिन शिंदे, अशोक हजारे, साहेबराव शिंदे,ज्ञानदेव पवार,दिनेश नवले,गुरुदेव नवले,नारायण भोसले,मनोहर जगताप,राजु खकाळ,सोमनाथ खकाळ,बिभिषण नवले,किसन पडोळे, भागुजी घुले उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.