10 लाखांहून अधिक लोकांनी पहिला माजी मंत्र्याचा मैं हुं डॉन व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय.

 10 लाखांहून अधिक लोकांनी पहिला माजी मंत्र्याचा मैं हुं डॉन व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय.





Vdo पहा 👆📽️


आष्टी (प्रतिनिधी) आपल्या अनोख्या शैलीने सर्वांना परिचित असलेले बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिलेले नाव म्हणजे माजी मंत्री सुरेश धस यांचे आहे.म्हणूनच लहानापासून थोरांपर्यंत आपली वेगळी क्रेझ निर्माण करणारा आणि ती लोकप्रियता टिकविनारा लोकप्रतिनिधी म्हणून धस यांच्याकडे पाहिले जाते.नुकत्याच गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत धस यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या याच दरम्यान त्यांनी विविध गीतांवर ठेका देखील धरला त्यातीलच मैं हु दोन यासह अन्य गाण्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.


मंगळवारी दिवसभर धस यांनी आष्टी सह मतदार संघातील विविध गणेश मंडळांना भेटी देत विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदविला.आष्टी शहरातील मानाच्या गणरायाची विसर्जन मिरवणुका दुपारपासूनच सुरू होत्या.ढोल ताशांचा गजर,पारंपारिक वाद्ये यासह डीजेच्या तालावर मंडळाचे युवक कार्यकर्ते यांच्यासोबत माजी मंत्री सुरेश धस यांनी देखील वाद्यांच्या तालावर ठेका धरत मै हु डॉन,आया है राजा लोगो रे लोगो यासह अन्य गीतांवर ठेका धरला.तरुणांनी अक्षरशः धस यांना डोक्यावर घेतले होते.धस यांनी देखील त्यांच्या  आनंदात सहभागी होऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली.उपस्थितांनी त्यांच्या या डान्सचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते 10 लाखांहून अधिक लोकांना आवडले आणि ते इतरांना शेअर केले.त्यामुळे नेहमीच या ना त्या कारणाने राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेल्या धस यांनी आपल्यातील वेगळेपणा पुन्हा एकदा सिद्ध केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.