मा. आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते आरती करुन बाबाजी गणेश मंडळांच्या गणरायाला वाजतगाजत निरोप

 मा. आ. भिमराव धोंडे यांच्या हस्ते आरती करुन बाबाजी गणेश मंडळांच्या गणरायाला वाजतगाजत निरोप 



आष्टी प्रतिनिधी 


येथील बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळांच्या  गणरायाचे रविवारी सायंकाळी वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. 

      रविवारी सकाळी श्री.गणरायाची आरती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे नेते मा.आ.भीमराव धोंडे  यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दादासाहेब जगताप व सौ. अर्चना दादासाहेब जगताप यांच्या हस्ते विधीवत पुजा करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अभयराजे धोंडे,  चेअरमन राजेंद्र धोंडे ,नगरसेवक आस्लम बेग, मधुकर जायभाये, अशोक गर्जे, कॉन्ट्रॅक्टर भागवत गर्जे, बाबुराव कदम, विधाते आण्णा,सचिन सायकड, डॉ  डी बी राऊत, प्रा. शिवदास विधाते, प्राचार्य डॉ वाघ,अभिलाष गाडेकर,नितीन निकाळजे, ग्रामपंचायत सदस्य प्रविण धोंडे, आदेश निमोनकर व इतर भक्तगण उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी बाबाजी प्रतिष्ठान गणेश मंडळांच्या गणरायाचे हजारों गणेश भक्तांच्या उपस्थितीत वाजतगाजत मिरवणूकीने जाऊन विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणरायाला निरोप दिला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.