पाच वर्षात गाव,वाडी,वस्तीवर विकास कामे केली ; जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये -- आ. बाळासाहेब आजबे
-------------------------------------------
--------------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर जाऊन त्याठिकाणी कोणत्या कामाची आवश्यकता आहे याची जनतेमध्ये बसून चौकशी करून जनतेच्या मागणीनुसार त्याठिकाणी आवश्यक विकास कामे केलेले आहेत परंतु विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.विरोधकांच्या भुलथापांना जनतेने बळी पडू नये असे आवाहन आ.बाळासाहेब आजबे यांनी केले.
आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांचा गाव भेट दौरा सुरू असून रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी खरकटवाडी ,देवळाली,लोखंडवाडी, घाटापिंपरी, पिंपरीघाटा, म्हसोबाचीवाडी,कारखेल ,तागडखेड,अरणवीहरा, चिंचेवाडी या गावामध्ये जाऊन पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे लोकार्पण व मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केले. यावेळी जेष्ठ नेते हरिभाऊ दहातोंडे, परसराम मराठे ,संदीप सुंबरे, शिवाजी शेकडे, महादेव डोके, नवनाथ तांदळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित पोकळे, सरपंच भारत भवर, नगरसेवक नाजीम शेख, सरपंच विठ्ठल नागरगोजे ,शामराव फसले ,सतीश कोहक ,मुरलीधर शेकडे, दिलीप तांदळे, सरपंच पोपट शेकडे, दतोबा तळेकर, बबनराव रांजणे, सिद्धेश्वर झांजे, शाहू झांजे ,नितीन आमटे, राजेंद्र पवार, अंकुश तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या गाव भेट दौऱ्याला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांमध्ये त्यांची डीजे,ढोल ताशांच्या गजरात बैलगाडीमधून स्वागत केले जात आहे.देवळाली,घाटा इतर गावांमध्ये बोलताना आ. बाळासाहेब आजबे म्हणाले की, मतदार संघात विकास कामे करण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य दिले आहे गेल्या २० वर्षांमध्ये माजी आमदारांनी जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा जास्त निधी आपण पाच वर्षांमध्ये मतदारसंघात आणला आहे त्यामुळे प्रत्येक गाव ,वाडी ,वस्ती या ठिकाणी विकास कामे करण्यात आली आहेत , एक आमदार पाच वर्षात काय विकास करू शकतो हे आपण जनतेला या पाच वर्षांमध्ये दाखवून दिले आहे ,वक्कल गायब करण्याची पद्धत आपण बंद केल्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने विकास कामे दिसत आहेत दर्जेदार निपक्षपाती पणे काम करण्याला आपण महत्व दिले त्यामुळे मतदारसंघात आज जिथे जाल तिथे विकास कामे दिसत आहेत याचाच पोटशूळ विरोधी लोकांना उठला आहे. आमच्या विकास कामावर टीका केली जात आहे मंजूर करून आणलेली कामेही मंजूर नाहीत असे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे , आता काहीच करता येईना म्हणून आम्ही केलेल्या विकास कामाचे बिले अडवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, आम्ही गेल्या पाच वर्षात निवडणूक संपल्यानंतर कधीही कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण विरोधक आहे.आपले तुपले कधी केले नाही परंतु काही लोकांना चांगल्या कामात खोडा घालण्याची सवय असल्यामुळे लोकांनी त्यांना गेले १० वर्षापासून दूर ठेवले आहे.विरोधक आपल्याकडे काही काम घेऊन आले तरी आपण कधीही दुजाभाव केला नाही त्याचीच पावती म्हणूनआज गावोगाव आपले मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आपण येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगीतले.
stay connected