संत व्यावहारिक पदार्थ मागत नाहीत परंतु परमार्थिक मागतात ---- ह.भ.प.संतोष महाराज मोरे

 संत व्यावहारिक पदार्थ मागत 
नाहीत परंतु परमार्थिक मागतात
---- ह.भ.प.संतोष महाराज मोरे

----------------------------------------



----------------------------------------

आष्टी (प्रतिनिधी)

संत महात्मे स्वताःसाठी काही मागत नाहीत तर समाजासाठी मागतात.थोडे घेऊन जास्त देतो तो भोळा असतो.  महादेव भोळा देव आहे.अल्प भक्तीने प्रसन्न होतो म्हणून शंकर भोळा आहे असे आपण म्हणतो.संत व्यावहारिक पदार्थ मागत नाहीत परंतु  परमार्थिक मागतात असे प्रतिपादन ह.भ.प.संतोष महाराज मोरे यांनी केले.

       आष्टी येथील श्री बेल्हेश्वर महादेव मंदीरयेथे श्रावणी तिसरा सोमवार निमित्त आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.  " शिवभोळा चक्रवर्ती" हा संत एकनाथ महाराज यांचा अभंग सोडविला.

     यावेळी ह.भ.प.निवृत्तीदादा महाराज बोडखे, ह.भ.प.रामदास डोरले महाराज, दिनकरराव तांदळे,राजेंद्र धोंडे, गोविंद पवार सर,पत्रकार उत्तम बोडखे,संपत धोंडे,सुभाष रासकर,रविंद्र तवले, दत्ता खाडे, प्रा.विजय राजपुरे महाराज, ग्यानदेव धोंडे, श्रीधर धोंडे,उत्तम धोंडे आदि मान्यवर उपस्थित होते. निवृत्तीनाथाचा अवतार शिवअवतार आहे. हनुमंतराय हे सुध्दा शंकराचा अवतार आहे. शंकराचे १८ नावे  आहेत.महादेव,उमापती,भोलेनाथ, उमेश,गंगाधर,त्रिनेत्र,त्र्यंबक, नीलकंठ, महेश,रुद्र, शंकर,शंभू,शूलपाणि, सदाशिव,सांब, गौरीहर,दीनानाथ,खंडोबा हे महादेवाचे नावे आहेत. भगवान शिवाचे शास्त्रात वर्णन केले आहे की, भगवान रामाचे स्मरण करणे आणि त्यांचे नामस्मरण करणे हे महादेवाचे आवडीचे काम आहे.(आयुर्वेदानुसार) भगवान शिव आणि हरी एकच आहेत.मन,बुद्धी, चिंतन,अहंकार हे एकाच अंतकरणाचे प्रकार आहेत. कामानुसार नावे बदलतात.भोळा चक्रवर्ती महादेव आहे.शंकराचे शिवनामाचे फलीत म्हणजे क्रोध,काम बाधा करीत नाहीत.भयाचे ९ प्रकार आहेत.रुपवानास वृध्दपनाची भिती, पैशावाल्याने चोरांची भिती, भोगवादवाल्यांना रोगाची भिती असते असे ह.भ.प.मोरे महाराज यांनी सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.