कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राष्ट्रीय महामार्गच्या मध्यभागी बसवण्यासाठी माजी मंत्री श्री धस यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची घेतली भेट

 *कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा राष्ट्रीय महामार्गच्या मध्यभागी बसवण्यासाठी माजी मंत्री श्री धस यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची घेतली भेट*



विकास साळवे बीडसांगवी आष्टी...

 बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील राष्ट्रीय महामार्गच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट माजी मंत्री सुरेश धस यांनी घेतली आहे 


बीड जिल्ह्यातील  आष्टी तालुक्यातील कडा या ठिकाण बीड ते अहमदनगर या राष्ट्रीय राज्य मार्ग क्र.५६१ या रस्त्याच्या उत्तर बाजूस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.  



या महामार्गाचे रुंदीकरण करून सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्यभागी बसवण्यात यावा. असे निवेदन आज माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांची नवीं दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेटीदरम्यान निवेदन दिले आहे 



बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पूर्वी पासून या ठिकाणी आहे. आष्टी तालुक्यातील समस्त भीम सैनिकांची मागणी आहे हा पुतळा मध्यभागी बसवल्यास दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत होऊन रहदारीला अडथळा येणार नाही अशी भौगोलिक स्थिती आहे.


त्यामुळे समस्त भीमसैनिक यांच्या विनंतीनुसार. विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सध्या असलेल्या जागेवरून मध्यभागी बसवण्यात यावा. यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंती माजी राज्यमंत्री श्री सुरेश आणा धस यांनी भेट घेऊन श्री गडकरी साहेब यांना केली, यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक आश्वासन दिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे अध्यक्ष यशवंत खंडागळे भारतीय बौद्ध महासभेचे संघटक सुभाष भादवे सर हे पण उपस्थिती होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.