इंजि. तानाजी जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 इंजि. तानाजी जंजिरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव 



      आष्टी 

      यशस्वी उद्योजक आणि समाजसेवेचे वृत्त घेऊन समाजासाठी योग्य दिशा दाखवत असलेले  मराठा सेवा संघाचे नेते इंजि.तानाजी( बापू )जंजिरे यांचा वाढदिवस आष्टी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .आष्टी येथील राजमाता जिजाऊ वस्तीगृहाततील सभागृहामध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला .यावेळी त्यांच्यावर अक्षरशा शुभेच्छांचा वर्षाव झाला.





     या वाढदिवसानिमित्त उद्योजक दिनेश अण्णा पोकळे यांनी  दिलेल्या शुभेच्छा मध्ये म्हटले आहे की, आदरणीय जंजिरे बापू मराठ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करीत आहेत. त्यांना मराठ्यांची" थिंक टॅंक "म्हणून ओळखले जाते .आष्टी तालुक्यातील कुंबेफळ या गावातील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांनी त्या काळात पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.



 पुणे येथेच यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले. आता वयाची एकसष्ठी नंतर आपला व्यवसाय आपल्या मुलाकडे सोपवून उर्वरित आयुष्यात समाजकार्य करायचे .असा त्यांचा मनोदय आहे. समाजापुढे जाऊन व समाजासाठी काहीतरी करायचे तळमळ असलेले मराठा समाजातील आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. सुमारे एक वर्षांपूर्वी आष्टी तालुका मराठा सेवा संघाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राजमाता जिजाऊ विद्यार्थी वस्तीगृह व जिजाऊ मंगल कार्यालयाचे रेंगाळलेले काम त्यांनी धडाडीने पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे .लवकरच या वस्तीगृहाचे व मंगल कार्यालयाचे लोकार्पण कार्यक्रम होणार असल्याचे समजते 



        मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर सर्व कक्षांच्या शाखा सुरू करून मराठा सेवा संघाच्या कार्याचा झपाटा वाढवणारे बापू म्हणजे समाजाला लाभलेला हिरा आहे. असे दिनेश पोकळे सर यांनी आपल्या शुभेच्छा मध्ये म्हटले आहे .



     त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवश्री गंगाधर बनबरे, प्राचार्य शशिकांत कन्हेरे पाऊस चालू झाला, सुवर्णा गिऱ्हे,महेंद्र मोरे, ॲड.निर्मलाताई सोनवणे ,प्रा. बाबासाहेब मुटकुळे, प्रा.दत्ता नरसाळे, मुकुंद लगड सर ,प्रा.सखाराम वांढरे , अनिता निंभोरे, ॲड.सीताराम पोकळे, पत्रकार अविषांत कुमकर ,पत्रकार संदीप घोडके ,प्रा. आप्पाराव टाळके इंजि.प्रल्हाद तळेकर, भास्कर निंबाळकर, आबासाहेब खिलारे, प्रशांत धस, विद्या चव्हाण ,वर्षा शिंदे ,माधुरी तवले ,महेंद्र मोरे, महेश सावंत ,सचिन सव्वाशे, राहुल सुरवसे ,तुकाराम नावडकर ,अण्णासाहेब सोळुंके, अविशंत जगताप आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.