गाव भेट दौऱ्यात ठिकठिकाणी लाडक्या बहिणीकडून आ.आजबे यांचे जोरदार स्वागत
आष्टी( प्रतिनिधी )
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांचा सध्या गाव भेट दौरा चालू असून शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी पाटोदा तालुक्यातील बारा ते तेरा गावांमध्ये त्यांनी भेट देऊन समस्या जाणून घेत लोकांचे प्रश्न तात्काळ सोडूण्यास प्राधान्य दिले यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल गावागावात लाडक्या बहिणींनी आमदार बाळासाहेब आजबे यांचे जोरदार स्वागत केले.
शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी, सगळेवाडी, दस पिंपळगाव, तगारा ,व खडकवाडी, काकडहिरा, निरगुडी ,उकंडा पिठी, नायगाव, बेदरवाडी ,डोंबरी रोहतवाडी व करंजन या गावांना भेटी देत आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी गावागावात जाऊन पारावर बसून गावातील समस्या समजावून घेत त्या तात्काळ सोडवल्या व शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम या दौऱ्या दरम्यान करण्यात आले त्याचबरोबर आजपर्यंत करण्यात आलेला विकास कामांचे लोकार्पण व विविध विकास कामांचे शुभारंभ ही आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी बोलतानाआ आजबे म्हणाले की प्रत्येक गावामध्ये एक कोटी पेक्षा जास्त रुपयांचे विकासकामे आपण आजपर्यंत केली आहेत त्यामुळे गावातून आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे अनेक गावांमध्ये विकास कामाबरोबरच शासनाच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्यामध्ये सिंचन विहीर शेत तलाव गाय गोठा यासारखे योजनाही कार्यकर्त्या व ग्रामपंचायतच्या मार्फत राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून येत्या 18 तारखेच्या आत दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर पडणार आहेत त्याचबरोबर उज्वला गॅस योजना मध्ये तीन सिलेंडर तर शेतकऱ्यांसाठी कृषी पंपास मोफत वीज पुरवठा यासारख्या योजना शासनाने राबवले आहेत या सर्व योजनांचा शेतकऱ्यांनी व सर्वसामान्य जनतेने फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले या दौऱ्यामध्ये पाटोदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक दादा घुमरे, ज्येष्ठ नेते विठ्ठल आण्णा सानप,सरपंच डॉ, प्रभाकर कवठेकर, सरपंच संदीप कवठेकर, सरपंच शिवाजी नेमाने सरपंच नारायण नागरगोजे ,गटप्रमुख मधुकर येवले केशव भोंडवे, किशोर जेधे, युवक तालुकाध्यक्ष युवराज झुणगुरे,अंगद भोंडवे, बाप्पासाहेब जाधव,अनिल दगडखैर, नानासाहेब कवठेकर ,बालाजी कवठेकर विजय काशिद, बन्सी खाडे ,उपसरपंच महादेव खाडे, अण्णासाहेब लवांडे ,शिवाजी मुळीक ,संजय कवठेकर ,बालाजी आवटे, महमूद पठाण ,हरी काशीद, राजाभाऊ काकडे ,संतोष बेंद्रे, गोरख बेद्रे, साहेबराव बेद्रे, श्रीकांत झुंनजुरे ,रमेश नागरगोजे, सरपंच संजय जायभाय धनंजय भुसनर शिवाजी भोसले यांच्यासह पिठी गणातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected