आ.बाळासाहेब आजबे यांची ऐतिहासिक कामगिरी आष्टी मतदार संघासाठी 638 ट्रान्स्फार्मरसह ,9 सबस्टेशनला मंजूरी

 आ.बाळासाहेब आजबे यांची ऐतिहासिक कामगिरी
आष्टी मतदार संघासाठी 638 ट्रान्स्फार्मरसह ,9 सबस्टेशनला मंजूरी

              




आष्टी प्रतिनिधी 

आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघांमध्ये अनेक दिवसापासून विजेचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत होता शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे नवीन सब स्टेशन व आष्टी येथे 50 केवीचे ट्रांसफार्मर साठी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून आष्टी मतदार संघासाठी ऊर्जा विभागाकडून सुधारित वितरण क्षेत्र अंतर्गत (आर डी एस एस )मोठ्या प्रमाणात नवीन सब स्टेशन सह इतर मागण्या मंजूर केल्याबद्दल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो आपण मागणी केलेल्या सर्व बाबींनामंजुरी दिल्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विजेता प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले .

------------------------

चौकट

*आ. बाळासाहेब आजबे यांची ऐतिहासिक कामगिरी *

आष्टी पडदा शिरूर मतदार संघाच्या इतिहासामध्ये गेल्या 64 वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर व सबस्टेशन मंजूर करण्याची ही पहिलीच वेळ असून आमदार बाळासाहेब आजबे हे शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांसाठी नेहमी सज्ज असतात हेच या कामगिरीवरून दिसून येते.

---------------------

       आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रयत्नातून आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र अंतर्गत (आर डी एस एस अंतर्गत )09 नवीन 33/ 11 चे सब स्टेशनला मंजुरी मिळाली आहे त्याचबरोबर सात अतिरिक्त भार असलेल्या ठिकाणी 5 Mvaचे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आहेत आष्टी येथे 50 kv चे ट्रान्सफार्मर व मागणी केल्याप्रमाणे तिन्ही तालुक्यातील गावांमध्ये 638 डीपींना मंजुरी देण्यात आली आहे, नवीन 33/11 सब स्टेशनला मंजुरी मिळालेले गावे पुढील प्रमाणे दादेगाव, पारोडी, धनगर जवळका, पारगाव घुमरा, शिरूर कासार, बीडसांगवी ,कोयाळ, आंभोरा, मातकुळी या ठिकाणी नवीन सबस्टेशन तर अतिरिक्त भार असलेले पोखरी धानोरा दौलावडगाव रोहतवाडी कोतन व कुसलंब या ठिकाणी 5 mva चे नवीन ट्रान्सफॉर्मर ला मंजुरी देण्यात आली आहे तर शेतकऱ्यांसाठी आष्टी तालुक्यात 242,पाटोदा तालुका 144 व शिरूर तालुक्यासाठी 237 आशा 638 नवीन विद्युत रोहित्र मंजुरी देण्यात आली आहे.  पुढे बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की गेल्या दोन महिन्यापूर्वी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडवणीस व कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे शेतकऱ्यांकडून आलेल्या मागणीनुसार व तालुक्यातील विजेचा तुटवडा लक्षात घेत वरील बाबींची मागणी केली होती त्या सर्व बाबीचा विचार करून महायुती सरकारने सर्व मागण्यांना मंजुरी दिल्यामुळे आष्टी तालुक्यातील विजेचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात विज मिळण्यास मदत होणार असून शेतकरी वर्गामध्ये ही समाधान व्यक्त केले जात आहे, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे आभार व्यक्त करतो व यापुढेही ऊर्जा विभागाच्या वतीने ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या गोष्टी आपण मंजूर करून आणू ऊर्जा विभागाअंतर्गत पाटोदा येथेही  उच्च दाब ट्रान्सफॉर्मर वाढवणे साठी मंजुरी मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे आपण इतर बाबींबरोबरच  ऊर्जा विभागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे आग्रह धरला होता त्यामुळे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या सर्व मागण्या मान्य केल्या आष्टी मतदारसंघाला झुकते माप दिल्याबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन करून आभार व्यक्त करतो असे आमदार बाळासाहेब आजबे शेवटी म्हणाले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.