कड्यात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा -------- एक लाख 44 हजार रुपयाच्या मुद्देमालासह नऊ जण ताब्यात

 कड्यात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा
--------
एक लाख 44 हजार रुपयाच्या मुद्देमालासह नऊ जण ताब्यात



---------------

 कडा / राजेंद्र जैन

--------------

कडा परिसरातील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शनिवारी चार वाजता छापा मारून नऊ जणांवर कारवाई केली. या छाप्यात पथकाने नऊ लाख 44 हजार पाचशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली.

बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या आष्टी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची पुण्याला बदली झाल्यापासून या ठाण्याला कारभारी नसल्यामुळे आष्टीसह परिसरात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले होते. बीडला नव्याने आलेले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रत्येक ठाण्यांतर्गत चालू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश ठाणेदारांना देण्यात आले आहेत. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार दि. 17 रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कडा येथील झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगत चालणा-या एका जुगार अड्ड्यावर छापा मारून नऊ जणांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाख 44 हजार 530 रुपयांचा मुद्देवाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थागुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी दिली. या कारवाईमध्ये पोलीस हवालदार मनोज वाघ, पोलीस नाईक विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, सुनील राठोड, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

-----%%----



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.