Ladaki Bahin Yojna: ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार

Ladaki Bahin Yojna: ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार



 राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी Ladaki Bahin Yojna लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही योजना मोठी मदतगार होणार आहे. या योजनेची नोंदणी आता 31 ऑगस्टपर्यंत सुरु करण्याची मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी अनेक अटींना सरकारने शिथील केले आहे. अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाची अट देखील सरकारने काढली आहे. आता केवळ रेशनिंग कार्ड दाखविले तरी पुरेसे ठरणार आहे. तसेच आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  त्यामुळे लाभार्थी महिलांची चिंता दूर होणार आहे.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या योजनेसाठी 31 ऑगस्टची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र या योजनेसाठी राज्य सरकारने एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स तयार केले आहे. मात्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप्सवर अर्ज भरताना अडचणी होत आहे.



ऑफलाईन अर्ज स्वीकारणार

या योजनेची वेबसाईट सुरळीत सुरू नसली तरी ऑफलाईन पद्धतीने 31 ऑगस्टपर्यंत आलेले सर्व अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे.  महिलांसाठी चांगली योजना राबवली असून या योजनेतून कुठलीही महिला वंचित राहणार नाही, त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारले जाणार असल्याने याचा फायदा महिलांना होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.