सुरेश धस यांच्या पंढरपूर येथील महापंगतीमध्ये
५० हजार वारकऱ्यांनी घेतला महाप्रसाद...i
*******************************
सुरेश धस विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत
वारकऱ्यांना स्वतः पंगतीमध्ये महाप्रसाद वाढण्याचे केले काम..
*******************************
*******************************
आष्टी (प्रतिनिधी)
वैराग्यमूर्ति...संत वामनभाऊ महाराज गहिनीनाथ गड यांच्या दिंडी सोहळ्या निमित्ताने माजी मंत्री सुरेश धस यांच्या वतीने आयोजित श्री.क्षेत्र पंढरपूर येथील महापंगतीमध्ये..गहिनीनाथ गड दिंडीतील सहभागी भाविक भक्त वारकरी यांच्यासह विविध संस्थानच्या दिंडीतील सहभागी सुमारे ५० हजार वारकरी भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला..
मंगळवार दि.१६ जुलै २०२४ रोजी श्री.क्षेत्र पंढरपूर येथे या महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक संत महंतांच्या पालखी समवेत ज्ञानोबा माऊली चे गजरात टाळ मृदंगाच्या ठेक्यावर भाविक भक्त आपला आनंद व्यक्त करत होते.. विठुरायाच्या भेटीच्या अगतिकतेने निर्माण झालेली धार्मिक भावना यावेळी उचंबळून येत असताना दिसत होती.या पुरुष, महिला वारकरी फुगड्या, हनुमान उड्या, अशा प्रकारचे विविध खेळ खेळत या विविध ठिकाणच्या दिंडी तील वारकरी पंढरीत पोहोचले आहेत.
वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ यांच्या परंपरेतील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील मठाधिपती हरिभक्ती परायण विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २० ते २५ हजार भाविक या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत या दिंडीतील सहभागी वारकरी बंधू भगिनीं आणि आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तालुक्यातील परिसरातील इतर दिंड्यांमधील भाविक भक्तांना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी या महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेण्याचे आवाहन केले होते...
त्याला प्रचंड प्रतिसाद देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जमलेल्या या भाविक भक्तांनी वारकऱ्यांसह सुमारे ५० हजारहून अधिक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी वारकऱ्यांना स्वतः सुरेश धस यांनी पंगतीमध्ये महाप्रसाद वाढण्याचे काम केले.. यावेळी त्यांचे समवेत जामगावचे सरपंच श्याम धस, युवा नेते जयदत्त धस ,युवानेते सागर धस त्यांच्यासह पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते यांची मोठी पलटण या महापंक्तीच्या तयारीसाठी गेले दोन दिवस पूर्वतयारीसाठी व्यवस्थापनामध्ये सक्रीय असल्यामुळे या महापंगती मध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित सर्व भाविक भक्त यांनी या महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेतला..
माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्यासमवेत त्यांचे कुटुंब याप्रसंगी उपस्थित होते या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच त्यांनी देखील या वारकऱ्यांसह महाप्रसादाचा लाभ घेतला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या महापंगतीमध्ये भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला.
stay connected