*बीड विधानसभेत काँग्रेसचा विजय कोणीही रोखु शकत नाही - गणेश बजगुडे पाटील*
बीड विधानसभा काँग्रेसने लढवण्याची मागणी
बीड / विधानसभा निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या असताना सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. त्यातच काल माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बीड विधानसभा काँग्रेस पक्षाला सोडुन घेण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली. बीड मतदार संघात काँग्रेस पक्षाला जनाधार असुन बीडची जनता पंजाच्या शोधत आहे. परंतु आघाडीच्या समीकरणात जिल्ह्यात जाणीवपूर्वक काँग्रेसला जागा सोडली जात नाही आघाडीच्या नेत्यांकडून जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम केले जात असेल व काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार खासदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी मतदार मात्र आज काँग्रेसच्या सोबत आहे बीड विधानसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पंज्याच्या चिन्हावर लढवल्यास विजय निश्चित आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांच्या भावनेचा आदर राखत महविकास आघाडीने बीड विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी त्याचबरोबर जर आघाडीतील नेते जर सन्मानाने बीडची जागा सोडत नसेल तर आपण किती दिवस फरफट सहन करायची स्थानिक स्वराज्य संस्थेपासुन लोकासभेपर्यंत जिल्ह्यात असलेल्या काँग्रेसच्या जनधरामुळे काँग्रेस सोबत असली पाहिजे परंतु जागा वाटपात किंवा निवडणुकी नंतर मात्र काँग्रेसला कुठेही विचारात घेतले जात नाही त्यामुळे सन्मानाने बीडची जागा काँग्रेसला नसोडल्यास काँग्रेसने स्वतंत्र लढले पाहिजे. जनता काँग्रेस सोबत असुन बीड विधानसभेत काँग्रेसचा विजय कोणीही रोखु शकत नाही. असे बीड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी केली.
stay connected