आनंदऋषी नेत्रालयाकडून पंचाहत्तर रुग्णांची तपासणी : कड्यात प्रत्येक रविवारी होणार मोफत नेत्र तपासणी
------------------------ कडा/ वार्ताहर ---------------
नगर येथील आनंद ऋषीजी नेत्रालय व जैन श्रावक संघ कडा यांच्यावतीने कडा येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात पंचाहत्तर रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
कडा येथे दर रविवारी आनंद ऋषीजी नेत्रालय व जैन श्रावक संघाच्या वतीने नेत्र तपासणी तसेच अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, कडा येथे प्रत्येक रविवारी शिबिरात नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. रविवारी आयोजित शिबिरात पहिल्याच दिवशी पंचाहत्तर जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळींसह उपसरपंच दीपक कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया, अमोलक जैन शिक्षण संस्थेचे सचिव हेमंत पोखरणा, ग्रामपंचायत सदस्य बिपिन भंडारी, पत्रकार राजेंद्र जैन, सुनील देशमुख, अजय चोरबेले , प्रकाश मुनोत यांच्यासह नेत्र रुग्णालयाचे किरण कवडे, नेत्र विशारद भागवत वीर व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात 75 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील सात जणांना नंबरचे चष्मे देण्यात आले. तर सहा रुग्णांवर नगर येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
stay connected