केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील भागवत वस्तीवर दरोडेखोरांचा दशहत माजवत सशस्त्र दरोडा
कडा/ राजेंद्र जैन तालुक्यातील केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील भागवत वस्तीवर दोरडखोरांनी दशहत माजवत सशस्त्र दरोडा टाकला. मारहाण करत दरोडखोरांनी सुमारे लाखों रुपायांचा रोख रकमेसह मुद्देमाल लूटून पोबारा केला.या हल्ल्यात राजू महादेव भागवत (वय ३०) यांच्यावर सुमारे नऊ चाकुचे वार झाल्याने त्यांना नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, केरुळ येथील राजू महादेव भागवत यांच्या घरामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात ७ ते ८ दरोडेखोर काठी, कुऱ्हाड,चाकू अशी हत्यारे घेऊन घरात घुसले. कुटुंबातील मुलासह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली. दरम्यान दरोडेखोरांनी भागवत यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लूटले.भागवत यांच्या घरात दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या राजू महादेव भागवत यांना मारहाण करत त्यांच्यावर चाकूने अनेक वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना नगरच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरुन पलायण केले .गावात दरोडा पडल्याचे समजताच अनेकजण जमले. नागरिकांनी डायल ११२ वर माहिती दिली. त्यामुळे कडा पोलिसांची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत दरोडेखोर दूरवर गेले होते. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पहाटेपासून आष्टी पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र फिरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांसह श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
-----------
आठ दिवसांत दुसरा दरोडा
---------------------------
मागील आठ दिवसापूर्वीच किन्ही येथील केरुळ रोडवरील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता. यामध्ये जवळपास सव्वा लाखाचे मुद्देमाल चोरून कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण झाली होती. अद्याप त्या घटनेचा तपास लागला नसतानाच किन्ही पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या केरुळ येथे हा दुसरा दरोडा पडला .याबाबत कार्यक्षमतेवर आणि तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
-------------
आष्टी पोलिस मलिदा गोळा करण्यात व्यस्त
---------------------------
आष्टी शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाकीचा धाक संपल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून, याकडे पोलिस जाणून-बुजून अर्थपूर्ण डोळेझाक करीत आहेत. पोलिसांना एखाद्या घटनेचा तपास लावण्याऐवजी महाशय अवैध धंदेवाल्याकडून मलिदा गोळा करण्यात दंग असल्याची जोरदार चर्चा आहेत.
stay connected