Mukhyamantri ladka bhau Yojana साठी ही आहे वयाची अट, तुम्हाला लागू होते का नाही? जाणून घ्या

 Mukhyamantri ladka bhau Yojana साठी ही आहे वयाची अट, तुम्हाला लागू होते का नाही? जाणून घ्या



राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेनंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी उमेदवारांच्या वयाची अट काय आहे? त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे लागणार आहेत? जाणून घ्या.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना  जाहीर केली. राज्यातील प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रूपये खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेची जोरदार चर्चा असून महिलावर्गाकडून सरकारचं कौतुक होताना दिसत आहे. या योजनेचे महिलांना येत्या रक्षाबंधनापासून पैसे मिळणार आहेत. या योजनेवरून विरोधकांनी तरूणांसाठी काहीच का केलं नाही? असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरूवात केली होती. मात्र अशातच राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची घोषणा केली असून यासाठी वयाची अट काय असणार जाणून घ्या.

लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकाराने उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयाच्या पात्रतेबाबत मोठा निकष आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत नसाल तर महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यामुळे याबाबतची सर्व काही माहिती जाणून घ्या. राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे. सरकार संबंधित तरुणांना विविध कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला 6 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंतचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे.

उमेदवाराचे किमान वय 18  आणि कमाल 35 वय असावे.

 उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ आयटीआय/पदशवका/पदवीधर/ पदव्युत्तर असावी.

 उमेदवार हा महाराष्ट्र महाराष्ट्राचा अधिवासी असावा.

उमेदवाराचे आधार नोंदणी असावी

उमेदवाराचे बँक खाते आधार सांलग्न असावे

उमेदवाराने कौशल्य , रोजगार, उद्योजकता आणि नाशवन्यता शवभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

उमेदवाराने कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 36 असलं पाहिजे. त्यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आधार नोंदणी असायला हवी.  मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्मदाखला किंवा वयाचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खाते पासबुक ही कागदपत्रे लागणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.