केरूळमध्ये सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांच्या हल्यात एक गंभीर जखमी

 केरूळमध्ये सशस्त्र दरोडा; दरोडेखोरांच्या हल्यात एक गंभीर जखमी

************************

आठ दिवसांत दुसरा दरोडा;
पोलिस मात्र हाप्ते गोळा करण्यात दंग

***********************

पीडित कुटुंबाला माजी मंत्री सुरेश धस यांची तात्काळ मदत

*********************



आष्टी(प्रतिनिधी)

तालुक्यातील केरुळ  येथील टेंभीच्या माळाजवळील भागवत वस्तीवर दरोडेखोरांनी दशहत माजवत सशस्त्र दरोडा टाकला.अमानुषपणे मारहाण करत दरोडखोरांनी सुमारे लाखों रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल लूटला.या हल्ल्यात राजू महादेव भागवत (वय ३०) यांच्यावर सुमारे १९ चाकुचे वार झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सोमवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.

        याबाबत दादासाहेब महादेव भागवत वय (३१ वर्षे) रा.भागवत वस्ती, केरुळ यांच्या फिर्यादीवरून, राहत्या घरी ज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या घरातील इतर व्यक्ती पडवीत झोपलेले असतांना घरात प्रवेश करून फिर्यादीच्या पत्नी,आई व मुलगा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन,फिर्यादीला काठीने मारहान करुन,फिर्यादीची बहीण व भाची झोपलेल्या घरात घुसुन त्यांच्या अंगावरील मणी मंगळसुत्र ओढुन घेऊन, कपाटातील एक सोन्याची अंगठी चोरुन त्यांना मारहाण करत चोरट्यांनी 1,77,500/- (अक्षरी एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये) मुद्देमाल तसेच फिर्यादीच्या भावास चाकुने डोक्यात, पाठीवर, पायावर, पोटात सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी करुन फिर्यादी कडील वरील वर्णनाचे सोन्याचे दागीने जबरदस्तीने दरोडेखोर पसार झाले आहेत फिर्यादी वरून गुन्हा दाखल झाला असून स.पो.नि.हिंगे यांचे आदेशाने पुढील तपास कामी स पो.नि. नरवडे हे करत आहेत.


चौकट 


पीडित कुटूंबाला माजीमंत्री सुरेश धस यांच्याकडून तात्काळ मदत


       सोमवारच्या रात्री ७ ते ८ दरोडेखोराकडून भागवत कुटुंबाला अमानुषपणे मारहाणीची घटना माजी मंत्री सुरेश धस व चिरंजीव जयदत्त धस यांना रात्रीच्या २ वाजल्याच्या दरम्यान दूरध्वनीवरून झाकीर शेख या कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर या घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी माजीमंत्री सुरेश धस यांनी पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणाला सूचना करत या कुटुंबाच्या मदतीला तात्काळ पाचारण केले. आधार देत जखमी असलेल्या राजू भागवत यांना तात्काळ अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले.



 मंगळवारी सकाळीच माजी मंत्री सुरेश धस यांचे चिरंजीव सागर धस यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित भागवत कुटुंबाला आधार दिला.

        मागील काही दिवसांपूर्वी डोंगरकिन्ही,टेंभुर्णी,किन्ही आता काल रात्री  केरूळ व चिखलीनाथ या ठिकाणी असे जमावाने येऊन दरोडेखोराने अमानुषपणे मारहाण करून कुटुंबचे कुटूंब लुटण्याचे जे प्रकार घडत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे. असा अनेक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मी स्वतः गृहमंत्र्याची भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करण्याचे विनंती करणार असल्याचेही माजीमंत्री सुरेश धस यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.