आष्टी नगरपंचायतच्या दिव्यांगाच्या खात्यात ५% निधी जमा : नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे,मुख्याधिकारी मोरे यांच्या हस्ते धनादेश वितरित

 आष्टी नगरपंचायतच्या दिव्यांगाच्या खात्यात ५% निधी जमा : नगराध्यक्ष जिया बेग,गणेश शिंदे,मुख्याधिकारी मोरे यांच्या हस्ते धनादेश वितरित



आष्टी - प्रतिनिधी / प्रा .शेख निसार

आष्टी नगरपंचायत स्वउतपन्नातील ५ टक्के राखीव निधी दिव्यांगाच्या खात्यात नगरपंचायतच्यावतीने नगराध्यक्ष जिया बेग,सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे,लेखापाल प्रकाश हरकाळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.हा निधी मिळाल्यानंतर दिव्यांगात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

       आष्टी नगरपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना नगरपंचायतच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग कल्याणसाठी राखून ठेवलेल्या ५ टक्के अनुदानाचे एकूण ६१ दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात निधी आष्टी नगरपंचायतच्यावतीने वितरित करण्यात आला.यावेळी आष्टी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण पोकळे, पत्रकार गणेश दळवी,पत्रकार शरद रेडेकर,शिवकुमार तांबे,संजय निकाळजे,रुपाली योगे,चंद्रकांत जपलवार, रोहिणी पोतदार, सतीश घोडके, विशाल म्हस्के,विद्या शिंदे,अशोक गायकवाड, छाया धोंडे,सुधाकर देशमुख,निलेश पवार यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी व दिव्यांग उपस्थित होते.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.