वाढदिवस एका असामान्य नेतृत्वाचा ; रुपेश (भाई) ठोंबरे यांना शुभेच्छा
रुपेश (भाई) ठोंबरे हे कर्तूत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा संगम असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व.... जनसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे राजकिय आणि विधायक नेतृत्व, सामान्य जनतेच्या अडीअडचणीत कसलाही विलंब न करता हजर असणारे व सामान्य माणसाला ही आपलासा वाटणारा नेता म्हणजे रुपेश भाई ठोंबरे उर्फ *बिनधास्त* भाई. अशा या पारदर्शक, खिलाडू, अभ्यासू, मुरब्बी, आक्रमक बिनधास्त लोकनेतृत्वाचा आज वाढदिवस....
पनवेल येथिल खानाव सारख्या छोट्याशा गावात जन्मलेले रूपेश ठोंबरे यांचा जन्म 28 जून 1987 साली झाला. शालेय जीवनातच त्यांच्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता.एक सच्चा व कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य करणारा युवा कसल्याही प्रकारचा राजकिय वारसा नसताना न्यु पनवेल युवासेना विभाग प्रमुख , शिवसेना नवीन पनवेल उपशहर प्रमुख नवीन पनवेल शिवसेना शहर प्रमूख ते आज पनवेल शिवसेना तालुका प्रमुख म्हणून कार्य करीत आहे.अलिबागचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे मानसपुत्र म्हणून परिचीत असलेले व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच रायगडचे शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांचे निकटवर्तीय विश्वासू म्हणून रुपेश भाई ठोंबरे बिनधास्त यांनी नावलौकीक मिळवले आहे.
सामान्य जनतेच्या समस्या निस्वार्थपणे सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असणारे व युवकांना क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन देणारे सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे रूपेश भाई ठोंबरे बिनधास्त नावाने सर्वांना परिचित आहेत. व्यसनाच्या आहारी न जाता युवकांनी क्रिडा क्षेत्रात यायला हवे असे मत असणारे रुपेश भाई दरवर्षी क्रिकेट सामने व इतर क्रीडा स्पर्धा आयोजित करतात. आत्तापर्यंत त्यांनी प्रोत्साहन पर दरवर्षी 55 बाईक बक्षीस म्हणून होंडा कंपनीच्या बाईक वाटप केल्या जातात आता पर्यंत तब्बल 155 बाईक रूपेश भाई ठोंबरे यांच्या कडून बक्षीस वितरण केले आहेत. कोविड काळात गोरगरीब जनतेसाठी अन्नछत्र उघडणारे पनवेल मधील एकमेव दानशूर व्यक्ती म्हणून
रुपेश भाई यांना ओळखले जाते. नवीन पनवेल परिसरातील आरोग्य समस्या, पाणी प्रश्न, लाइट बिल प्रश्न असो अधिकाऱ्यांना धारेवर धरून काम करून घेण्याची त्यांची " हातोटी" प्रश्न मार्गीच लावते.आता पर्यंत कुठला पुरस्कार न घेता आपली कामाची पद्धत बदली नाही .
त्यांचा हा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होणार असून त्यानिमित्ताने रुपेश भाई ठोंबरे बिनधास्त यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीच समाधानाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हिच परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना...!
stay connected