वाघळूज जवळ इको व दुचाकीची समोरा समोर धडक : दुचाकीस्वार गंभीर जखमी

 वाघळूज जवळ इको व दुचाकीची समोरा समोर धडक : दुचाकीस्वार गंभीर जखमी




धानोरा ( सय्यद शौकत / बाळा चव्हाण) - आष्टी तालुक्यातील वाघळूज व बाळेवाडी फाटा दरम्यान नगर - जामखेड रोडवर दुचाकी व ईको गाडीची समोरा समोर धडक होऊन अपघात घडला . या अपघातात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला असुन त्यास तात्काळ अहमदनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे .

सविस्तर वृत्त असे की आज शुक्रवार दि . २८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अहमदनगर कडून जामखेड कडे दुचाकी क्र . MH 14 AN 8882 वरून चाललेल्या दुचाकीस्वार अशोक विष्णु गायकवाड वय 34 हा इको व्हॅनला समोरा समोर धडक होवून अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार अशोक गायकवाड हा गंभीर जखमी झाला . त्याला उपचारासाठी अहमदनगर येथे हलविणात आले . अशोक गायकवाड हा युवक मोहा ता . जामखेड चा रहिवाशी असल्याचे समजते . घटनेचे वृत्त समजताच अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल पोकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली . ही घटना वाघळूज जवळ घडली . धानोर्‍याकडून नगर कडे जाणाऱ्या ईको गाडी समोर अचानक झाड कोसळल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते .







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.