गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान - सुरेश धस यांच्या मागणीला यश

 गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान - सुरेश धस यांच्या मागणीला यश



आष्टी प्रतिनिधी - पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.त्यात माजी आ. सुरेश धस यांनी दुधाला किमान पाच रुपये तरी भाव वाढवून द्या अशी मागणी केली होती.त्यावर राज्य शासनाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.त्यामुळे माजी आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश आल्याने शेतरीवर्गामधून समाधान मानले जात आहे.

                विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल वरील मुल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट, मुद्रांक शुल्क दंडात कपात, मुद्रांक शुल्क परतावा आदी माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.या मध्ये शेतरीवर्गामधून दुधाचे भाव वाढावे म्हणून माजी आ.धस गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती.यावर विचार करत 

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठीही  घोषणा करण्यात आल्या आहेत.राज्यात गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.त्यासाठी 331 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.तसेच कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 500 रुपये देण्यात येणार आहेत. व गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 1 जुलैपासून हे अनुदान दिले जाणार आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.