मोदीची लाट ओसरली, भाषण संपण्यापूर्वी मतदार घरी निघाले; Video Viral

 मोदीची लाट ओसरली, भाषण संपण्यापूर्वी मतदार घरी निघाले; Video Viral 





भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या नरेंद्र मोदींना मतदारांनीच पाठ दाखवायला सुरुवात केली आहे. सोमवारी पुण्यात झालेल्या सभेत खुर्च्या रिकाम्याच असल्याचं पाहायला मिळालं होतं. पुणेकरांनंतर आता मंगळवारी सोलापूरकर मतदारांनीही मोदींना चांगलाच हिसका दाखवला. मोदींचं भाषण सुरू असताना मतदारांनी घरची वाट धरल्याचं यावेळी पाहायला मिळालं.





माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सकाळी सभा पार पडली. सभेला गर्दी जमवण्यात युतीच्या नेत्यांना यश आल्या सारखं वाटलं. मात्र, सभा संपेपर्यंत मतदार काही भाषण ऐकण्यासाठी थांबले नाहीत. मोदींचे भाषण सुरू असतानाच लोकांनी घरची वाट धरली.


दस्तुरखुद्द मोदींनी वेगवेगळ्या घोषणा देऊन सभेला आलेल्या लोकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळाला नाही. आजची सभा म्हणजे धरून आणलेले लोक होते की काय अशी शंका यावी इतपत परिस्थिती दिसत होती. भाजपचे कार्यकर्ते वगळता मोदींच्या भाषणाला फारसा कोणी प्रतिसाद देताना दिसून आलं नाही. भाषण सुरू असताना लोक मंडपातून निघून चालल्याने, पोलिसांनी बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले तरीही त्यातूनही मार्ग काढून मतदारांनी घर गाठलं.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.