युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार- Bajarang Bappa Sonavane

 युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून ,आष्टी तालुक्यात मोठा प्रकल्प उभा करणार-  बजरंग बप्पा सोनवणे

     



       आष्टी तालुक्यातील शेतकरी युवकांच्या हाताला काम मिळावे म्हणून या तालुक्यामध्ये मी एक मोठा प्रकल्प उभा करील. मी दोन साखर कारखाने यशस्वीपणे चालवत आहे. व शेतकऱ्यांच्या ऊसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव देत आहे. शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे. गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे म्हणून मी हा प्रकल्प उभा करणार आहे असे प्रतिपादन बीड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी बेलगाव येथे केले. 





       आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे बीड लोकसभेच्या प्रचारानिमित्त ते मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आले होते. पुढे बोलताना श्री सोनवणे म्हणाले की, आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी केलेले आंदोलन लोकशाही मार्गाचे व घटनेला धरून आहे. तरी सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठा समाजाच्या एकीमुळे व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या निस्वार्थ कार्यामुळे हे आंदोलन यशस्वी होत आहे. मी खासदार झालो तर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला न्याय मिळवून देईल. तसेच मुस्लिम आरक्षण व धनगर आरक्षण व इतर सर्व सामाजिक चळवळींना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. 

     विद्यमान खासदार व त्यांच्या भगिनी उमेदवार यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली. या परिवाराने नगर -बीड -परळी या रेल्वे मार्गाचा प्रश्न जाणून बुजून रेंगाळत ठेवला आहे. शेतकऱ्यांचा कांदा, सोयाबीन, कापूस, तुर इत्यादी पिकांच्या भावाबादचा प्रश्नावर त्यांनी एकदाही संसदेत तोंड उघडले नाही. त्यांना मिळालेला निधी सुद्धा त्यांना जिल्ह्यामध्ये खर्च करता आला नाही. एकदम निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची गणना होते. अशीही  टीका सोनवणे यांनी केली. 





      आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये माजी शिक्षणाधिकारी विक्रम अण्णा पोकळे यांनी बजरंग बप्पा यांचा परिचय करून दिला. व बजरंग बप्पा सोनवणे यांच्या तुतारी या चिन्हालाच मते द्यावीत असे आवाहन केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार ॲड. सीताराम पोकळे म्हणाले की 1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार दरेकर नाना यांचा पराभव झाल्यानंतर मी राजकारण सोडून दिले होते. परंतु आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संदेशाचे पालन करण्यासाठी मी पुन्हा राजकीय स्टेजवर आलो आहे. तेव्हा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवावा व बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे ते म्हणाले. बजरंग बप्पा सोनवणे हे  या लोकसभा निवडणुकीमध्ये दीड लाख मताच्या मताधिक्याने निवडून येतील असेही ते ठासून म्हणाले. मोहन त्रिंबक पोकळे, कैलास गंगाधर पोकळे यांचेही यावेळी समायोजित भाषने झाली.

      या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार साहेबरावजी दरेकर नाना हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पोकळे यांनी केले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष परमेश्वर काका शेळके, इंदिरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अध्यक्ष राम खाडे, आम आदमी पार्टीचे डॉ.महेश नाथ, कडा बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव सुरवसे, डॉ. विलासराव सोनवणे, चिंचाळा गावचे सरपंच युवा नेते अशोक अण्णा पोकळे, अहमद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

     ज्येष्ठ नागरिक राज्याचे निवृत्त फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे, निवृत्त पीएसआय रावसाहेब पोकळे, दिलीप पोकळे पुढारी, मारुती मामा पोकळे, कांता थोरात, माऊली खिळे, लक्ष्मण बंकट पोकळे, मोहन त्र्यंबक पोकळे, जालिंदर गणपत पोकळे, फुलचंद हिराजी पोकळे,सदाशिव पोकळे (चेअरमन), कमलाकर पोकळे, दत्तू पोकळे, किशोर धोंडीबा पोकळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     बजरंग बप्पा सोनवणे यांचे आगमन होताच त्यांना अकरा तोफांची सलामी देण्यात आली. नवरदेवाप्रमाणे उचलून घेऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केल्यानंतर सभेस सुरुवात झाली.

      ही प्रचार सभा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री गणेश खोटे (ग्रामपंचायत सदस्य), बाळू लक्ष्मण पोकळे (ग्रामपंचायत सदस्य), ज्ञानेश्वर पद्माकर पोकळे, गणेश रघुनाथ पोकळे, अण्णासाहेब पोकळे, शिवम पोकळे, संतोष चंद्रभान पोकळे, रोहित नाना पोकळे, प्रवीण बाबासाहेब पोकळे, अमोल देविदास पोकळे, आबासाहेब पोकळे ( सोन्या), कैलास पोकळे, श्रीनाथ पोकळे, महेश फुलचंद पोकळे, कृष्णा विक्रम पोकळे, बाळासाहेब विठ्ठल पोकळे गणेश बबन पोकळे, अविनाश भैय्या प्रकाश पोकळे या युवकांनी परिश्रम घेतले.ज्येष्ठ पत्रकार ऍड.सिताराम पोकळे यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.