पंकजाताई मुंडे,अशोक हिंगे,बजरंग सोनवणे यांच्यासह एकूण ४१ उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात,निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणे अपेक्षित असताना जातीपातीवर व वैयक्तिक टीका टिपणीवर लढवली जाणार काय ?मतदारांचा सवाल.

 पंकजाताई मुंडे,अशोक हिंगे,बजरंग सोनवणे यांच्यासह एकूण ४१ उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात,निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणे अपेक्षित असताना जातीपातीवर व वैयक्तिक टीका टिपणीवर लढवली जाणार काय ? मतदारांचा सवाल.



केज/प्रतिनिधी 

विशवास राऊत 

सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदानआहे. भाजपच्या पंकजाताई मुंडे,वंचित बहुजनआघाडी चे अशोक हिंगे पाटील, शरद पवार यांच्याराष्ट्रवादी पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यासह एकूण ४१ उमेदवार लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाईल असे अपेक्षित होते परंतु विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता जातीपातीच्या व वैयक्तिक टीका टिपणी करण्यातच उमेदवार धन्यता मानत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. 

गेल्या अनेक निवडणुकीत फक्त बीडच्या रेल्वेचा प्रश्न निवडणूक आली की, निर्माण होतो निवडणूक संपली की,रेल्वेचा प्रश्न थंड होतो मतदार राजा देखील आता जागृत झाला आहे.सध्या महागाई,नोकरी, शेतकऱ्यांचे प्रश्न,उद्योग धंदे यासह विविध विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारांनी बोलणे अपेक्षित असून त्यापेक्षा उमेदवार हे जातीपातीवर व वैयक्तिक खालच्या पातळीवर जावून टीका टिपणी करत आहेत. त्यामुळे मतदार हे नाराज होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

सुरुवातीला पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे या दोघात दुहेरी लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते परंतु वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पंकजाताई मुंडे,अशोक हिंगे पाटील, बजरंग बप्पा सोनवणे या तिघात तिरंगी लढत होईल असे सध्या तरी चित्रदिसून येत आहे. जानेवारी २०२४ च्या मतदार रचने नुसार बीड जिल्ह्याची एकूण मतदार संख्या २१ लाख १५ हजार ८१३ एवढी असून यामध्ये मराठा ८ लाख ३२ हजार ४०२,मुस्लिम २ लाख ५० हजार ९०७,वंजारी २ लाख ९६ हजार ४०९, ब्राह्मण ४१ हजार ५१६, मागासवर्गीय २ लाख ४८ हजर ७७१,इतर मागास वर्गीय ४ लाख १४ हजार ९४८, मारवाडी ३६ हजार ६७७ एवढे मतदान आहे. 

असे मॕसेज सोशल मिडीयावर फीरत आहे.सध्या तरी मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत पाहावयास मिळत आहे.प्रत्येक उमेदवाराला वाटते की,मनोज जरांगे पाटील हे मराठासमाजाला सांगून आम्हालाच मतदान करायला सांगतील अशी अपेक्षा आहे.मात्र मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला संदेश दिला आहे की,ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय अशांना पाडा परंतु मनोज जरांगे पाटील हे प्रकाश आंबेडकर यांनामार्गदर्शक मानत आहेत.परंतु त्यांना देखील त्यांनी जाहीर पाठिंबा दिल्याचे दिसून येत नाही.तिन्ही उमेदवार  हे मराठा समाजाच्या मतदानावर दावा करत आहेत मराठा मतदान त्यांच्या पाठीमागे आहे असे ते गृहीत धरून चालत आहेत. तर मराठा समाजाचे युवक हे फेसबुक,व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करताना व कमेंट करताना दिसून येत आहेत.परंतु शेवट पर्यंत हे वातावरण कायम उमेदवार यांना साथ देईल का? हे पाहणे गरजेचेआहे सर्व चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल.कोणत्या उमेदवाराला मराठा समाज मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळणार आहे हे आगामी काळात समजुन येईल.तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे.यामध्ये माळी,धनगर,मुस्लिम, मराठा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,वडार, बंजारा यांच्यासह वंचित घटकातील समाज हा त्यांच्या सोबत आहे व त्यांना मानत आहे.ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षणा संदर्भा तील भूमिका व त्यांनी मराठा समाजाचे अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली आहे.अशोक हिंगे हे देखील मराठा समाजाचे काही मतदान त्यांच्या पाठीमागे आहे असे दिसुन येत आहे.जातीपातीचे व गटबाजीचे समीकरण नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.पण या निवडणुकीत मागास वर्गीय इतर मागासवर्गीय, मुस्लिम समाजाचीभूमिका कोणाच्या पाठीमागे राहणार हे निर्णायक ठरणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.