CHH.SAMBHAJINAGAR : अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देणार : Asaduddin Owaisi
- अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे झालेल्या जाहीर सभेत केली. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहोत, तेथील मतदारांनी त्यांना मतदान करावं अस आवाहन त्यांनी यावेळी केलं. तर दुसरीकडे जाहीर सभेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात जोरदार टीका करत असताना वंचित आघाडीच्या विरोधात मात्र एकही शब्द त्यांनी काढला नाही. त्यामुळे आगामी काळात वेगळं समीकरण तर जुळणार नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आता मासबंदीचा उच्चार सुरू झाला आहे. उपवासाच्या काळात मास खाऊ नका असं ते म्हणतात, तर मी 30 दिवस रोजा पकडतो त्या काळात तुम्हीही जेवण करू नका असं मी म्हणलं तर चालेल का? असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. इलेक्ट्रॉल बॉण्ड माध्यमातून सहा हजार कोटी रुपये भाजपला मिळाले. तर इतर पक्ष देखील कुठे मागे नाहीत. मात्र मांस विकणाऱ्या कंपन्यांनी दिलेले पैसे इलेक्ट्रॉल बाँडच्या माध्यमातून कसे चालतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. एकीकडे मास विकणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे आणि दुसरीकडे मास विक्रीचे दुकान बंद ठेवायचं असं सांगत गरीबाच्या पोटावर पाय मारायचं काम मोदी करतात असं आरोप ओवेसी यांनी केला. तर सर्व पक्षांना इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून पैसे मिळाले मात्र आम्हाला या बॉण्ड ची गरज नाही, आम्ही तर जेम्स बॉण्ड आहोत अशी मिश्किल टीका त्यांनी राजकीय पक्षांवर केली. आमचा जनतेसोबतचा बॉण्ड खूप चांगला आहे, त्यामुळे आम्हाला पुन्हा यश मिळेल असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.देशात जेव्हा वेगवेगळे कायदे केले गेले, त्यावेळी शिवसेना भाजप सोबत होती. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा ओळखा असा आरोप ओवेसी यांनी जाहीर सभेत केला. देशात एन.आर.सी, सीएए, ट्रिपल तलाक, राम मंदिर हे कायदे होत असताना शिवसेनेने मोदीला पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक काँग्रेस आणि एक भाजप यांच्या विरोधात आपली ही लढाई असल्याचं ओबीसी यांनी जाहीर सभेत सांगितला. तर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात इम्तियाज जलील यांनी मागील पाच वर्षात काम करताना, येणारा माणूस कुठल्या समाजाचा किंवा जातीचा आहे हे न पाहता काम केलं. त्यामुळे जनता पुन्हा एकदा त्यांना संधी देईल असा विश्वास ओवेसी यांनी व्यक्त केला.2019 च्या आधी वीस वर्ष असलेले खासदार खान की बाण असं बोलत होते. मात्र आता त्यांचा बाण कुठे गेला असा टोला ओवेसी यांनी लगावला. ज्यावेळेस एखादा माणूस विनाकारण अनावश्यक बडबड करतो त्यावेळी त्याच्याच गळ्यात तो साप पडतो अशी अवस्था शिवसेनेची झाली असून आता मशाल त्यांना घ्यावी लागली अशी मिस्कील टीका यावेळी ओवेसी यांनी ठाकरे गटावर केली आहे.
stay connected