आष्टीत आ.suresh dhas यांच्या हस्ते pankajatai Munde यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ.

 आष्टीत आ.सुरेश धस यांच्या हस्ते पंकजाताई मुंडे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ..

***********************************



***********************************

 आष्टी (प्रतिनिधी)

बीड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माजी ग्रामीण विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी विधानसभा मतदार संघासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुरेश धस यांच्या हस्ते संपन्न झाले..

         आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.. 

 यावेळी बोलताना ते म्हणाले की,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि महायुती या उमेदवार असलेल्या पंकजाताई साहेब मुंडे या दि.१८ एप्रिल रोजी आष्टी मतदारसंघात येत असून दि.२४ एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांमधील प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क असणारे गाव पातळीवरील कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरपंचायतीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे..

 भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय आणि केंद्रीय स्तरीय निवडणूक समितीद्वारे आलेल्या सूचनांप्रमाणे निवडणूक प्रचाराची तयारी करण्यात येत आहे..

 दि.१८ एप्रिल रोजी पंकजाताई मुंडे या आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये येत असून त्याच्यासाठी कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात येत आहेत..त्यामध्ये

 लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळातील प्रचाराची रणनीती ठरवण्यात येणार असून गेली १० वर्षे संपूर्ण जगामध्ये आपले नेतृत्व सिद्ध केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून.." अबकी बार फिरसे मोदी सरकार " आणि "अब की बार चारसो पार " एवढ्या संख्येने लोकसभा सदस्य निवडून द्यावयाचे असून..

 बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री  पंकजाताई मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी.. गाव पातळीवरील कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीच्या रचनेतील गटप्रमुख, गण प्रमुख, बूथ प्रमुख  शक्ती केंद्रप्रमुख, सरल ॲप प्रमुख, नमो अॅप प्रमुख ही सर्व प्रचार यंत्रणा सक्षमतेने कामाला लागावी यासाठी हे आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती च्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले..

यावेळी अरुण निकाळजे,परिवंत गायकवाड, रमजान तांबोळी, युवराज पाटील, जिया बेग,गणेश शिंदे,राजू शिंदे,संदीप खकाळ,सचिन लोखंडे,शैलेश सहस्रबुद्धे,रंगनाथ धोंडे,खंडू जाधव,बाळासाहेब घोडके, अजित घुले,सुरेश वारंगुळे,माजी सभापती दत्तात्रय जेवे, सादिक कुरेशी, अशोक मुळे, अतुल कोठुळे, गंगाधर पडोळे, रामशेठ मधुरकर,आत्माराम फुंदे,संदीप खेडकर, संजय ढोबळे, हिराभाऊ केरुळकर,गणेश मोकाशे,किशोर झरेकर, इरशाम खान, मेजर सतीश ढवळे, गणेश पोकळे, बबन लोंढे, सरपंच रोहिदास पवार,मारुती पवार,संदीप पानसांडे,मनोज धनवडे, अशोक लगड,शरद भगत, शिवाजी सानप,सतीश टकले आदी पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.