केज तालुक्यातीलटाकळी येथे बजरंग बप्पा सोनवणे यांना पहिला धक्का; युवा नेते श्रीकांत घुले यांनी हाती घेतले कमळ ;अजून पुलाखालून बरेच पाणी वाहणार मतदारांची प्रतिक्रिया
केज/प्रतिनिधी
विशवास राऊत
बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना केज तालुक्यातील टाकळी येथे पहिला येथे पहिला धक्का बसला असुन युवानेते श्रीकांत घुले यांनी कमळ हातात घेतले आहे.अजून पुला खालून बरेच पाणी वाहणार आहे अशी चर्चा मतदारातून आता रंगू लागली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचे खास विश्वासु व एकनिष्ठ,कट्टर समर्थक निष्ठावंतकार्यकर्ते म्हणून युवानेते श्रीकांत घुले हे संबंध तालुक्यात परिचित होते व तशी त्यांनी एकनिष्ठ भूमिका देखील मागील काही काळात बजावलेली आहे.
माजी उपसभापती नारायण बप्पा घुले,युवा नेते अनंतकुमार घुले, श्रीकांत घुले यांनी पंकजाताई मुंडे यांचे समर्थक विष्णू घुले यांच्या विरोधात टाकळी कदमवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लढवून त्यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली व अनंतकुमार घुले यांच्या पत्नी सौ.सुनिता घुले या टाकळीच्यासरपंच आहेत.युवा नेते श्रीकांत घुले यांनी बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली काम करत असताना केज तालुक्या तील भाजप सह इतर पक्षाच्या अनेक ठिकाण च्या ग्रामपंचायतची सत्ता बजरंग बप्पाच्या हातात आणून दिलेल्या आहेत. माजी उपसभापती नारायण बप्पा घुले,युवा नेते श्रीकांत घुले, अनंतकुमार घुले यांचा चिंचोली माळी सर्कल मध्ये मोठा जनसंपर्क व त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे टाकळीसह चिंचोलीमाळी सर्कलमध्ये बजरंग बप्पा सोनवणे यांना पहिला धक्काबसला आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.टाकळी येथील स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी उप सभापती नारायण बप्पा घुले,रामकृष्ण काका घुले व गावातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ या सर्वांनी पंकजाताई यांच्या पाठीशी शतप्रतिशत उभे राहण्याचे नागरिकांना आवाहन केले व तसे आश्वासन दिले आहे.युवा नेते अनंतकुमार घुले, श्रीकांत घुले,सुरेश घुले, डॉ.ज्ञानोबा मुंडे,व्यंकट बारगजे,सुरेश घुले,विक्रम घुले,अरुण घुले,महेंद्र बारगजे,तुकाराम घुले यांनी गावातील गटातटा च्या राजकारणात नपडता मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी उभे राहून ताईंना खासदार करू अशी नागरिकांना विनंती केली व सर्वांना आवाहन केले आहे.टाकळी गावच्या सरपंच सौ.सुनिता घुले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने भाजप च्या लोकसभेच्याउमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार,संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते श्रीकांत घुले सह त्यांचे वडील,बंधू व त्यांचे कार्यकर्ते हे बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विरोधात भाजपा च्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत.महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना केज तालुक्यातील टाकळी येथे पहिलाधक्का बसला आहे.अशी चर्चा केज तालुक्यात जोरदार रंगू लागली आहे.युवा नेते श्रीकांत घुले यांनी केज तालुक्यातील भाजपा इतर पक्षाच्या अनेक ग्रामपंचायतची सत्ता ही बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हाती आणून दिली आहे हीच एक हाती सत्ता आता श्रीकांत घुले हे भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या हाती देतील काय?असा सवाल ही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
बजरंग सोनवणे यांना युवा नेते श्रीकांत घुले यांनी टाकळी येथे पहिलाधक्का दिला आहे व केज तालुक्यातून अजून पुलाखालून बरेचसे पाणी वाहणार आहे अशी चर्चा देखील नागरिकांतून ऐकण्यास येत आहे.
stay connected