सेवानिवृत्त अभियंता इनायततुल्ला बेग हे उमराह यात्रेवरून परतल्यानंतर आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सत्कार
********************************
**********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष जिया बेग यांचे वडील माजी सेवानिवृत्त जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता इनायततुल्ला बेग यांनी नुकतीच बेग परिवारासोबत सौदी अरेबियातील मक्का येथील उमराह यात्रा पूर्ण केल्याबद्दल आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला होते.
सौदी अरेबियातील मक्का येथे वार्षिक हज यात्रेवैतिरिक वर्षभरात पवित्र काबाचे दर्शन घेण्यासाठी उमराह यात्रेनिमित्त अनेक मुस्लिम बांधव जगभरासह देशांमधून यात्रेकरू दरवर्षी मक्का येथे जात असतात. इस्लाम धर्माच्या पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक तत्त्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरीत्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे, असे सांगितले जाते. जीवनात कळत-नकळत झालेले पाप धुऊन टाकणारा आणि अल्लाहच्या नजीक नेणारा एक आध्यात्मिक अनुभव म्हणून हज यात्रेबरोबर उमराह यात्राकडे पाहिले जाते. मुस्लिम धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक म्हणूनही याकडे पाहिले जाते.आष्टी शहरातील माजी सेवानिवृत्त जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता इनायततुल्ला बेग,पत्नी आयशा बेग,मुलगा डॉ.सिद्दीक बेग आणि परिवारातील पाच सदस्यांनी काबाचे दर्शन घेत मक्का मशिदी पंधरा दिवस नमाज पठण करत दुवा मागितली.ही यात्रा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असल्याकारणाने येथून येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले जाते याचेच औचित्य साधून आष्टी तालुका पत्रकार संघाच्या वतीने इंजि. इनायततुल्ला बेग यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल भाऊ सहस्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सेवानिवृत्त शॉप निरीक्षक मजहर बेग, नगराध्यक्ष जिया भाई बेग, इंजि.अत्तहर बेग,डॉ.सिद्दीक बेग,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे,उपाध्यक्ष संतोष सानप,पत्रकार गणेश दळवी,पत्रकार सचिन रानडे, शिक्षक राजेंद्र लाड आदी उपस्थित होते.
stay connected