पंकजाताई मुंडे,मनोज जरांगे पाटील,अशोक हिंगे पाटील एकाच व्यासपीठा वर बजरंग सोनवणे यांनी ही जरांगे पाटलांची घेतली भेट ; नारळी सप्ताहाच्या समारोपाला उमेदवारांची उपस्थीती.
बीड /प्रतिनिधी विशवास राऊत -
बीड लोकसभेच्या भाजप पंकजाताई मुंडे, मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी एकाच ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांंगे पाटील यांची भेट घेतली याबाबत सविस्तर माहीती अशी की, पंकजाताई मुंडे,मनोज जरांगे पाटील,अशोक हिंगे पाटील व बजरंग सोनवणे हे गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील श्रीक्षेत्र नारायण गडावरच्या नारळी सप्ताह समारोप प्रसंगी रविवारी एकत्र आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.यावेळी बीड लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले.दोघांनी नमस्कार केला.पंकजाताई यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली.काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नसते,असे विधान केले होते.त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या नादी लागू नका असा इशारा दिला होता.त्यावर पंकजा ताई मुंडे यांनी याचा खुलासा केला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यातच रविवारी दुपारी हे तिघेही एकाच व्यासपीठावर आले होते.पंकजाताई व्यासपीठावर गेल्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.ही गर्दी पांगविण्यासाठी व कार्यकर्त्यांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांनी मदत केली होती.साधारणतः दहा मिनिटे हे दोघेही एकाच व्यासपीठावर होते. गर्दी मुळे त्यांच्यात फारसे संभाषण होऊ शकले नाही.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांची देखील उपस्थिती होती.दरम्यान मराठा समाजाच्या मतावर डोळा ठेवुन सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मिडीयावर महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही मराठा समाजाचे शञु असुन त्यांना आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. आपण विधान सभेची निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी अगोदर च सांगितले आहे.त्याचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसत आहे.
stay connected